• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2017

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना भरपाई

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना भरपाई

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवरील बांधकामधारकांच्या पूनर्वसन आणि पुनःस्थापनेसाठी द्यावयाच्या भरपाईबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यात उपग्रह नकाशानुसार बांधकाम अस्तित्वात न आढळल्याने अपात्र ठरविलेल्या मात्र प्रत्यक्ष मोजणीत आढळून आलेल्या 223बांधकामांना भूखंड मिळण्यासाठी पात्र ठरविण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. त्याबरोबरच प्रकल्पबाधित गावातील बांधकामधारकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी घरभाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या धारकांना नुकसान भरपाई देण्यासह या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या बांधकामधारकांच्या पुनर्वसन आणि पुनःस्थापनेसाठी द्यावयाच्या लाभाबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना योग्य लाभ देण्याचा निर्णय झाला. यानुसार पती-पत्नी यांची स्वतंत्र बांधकामे किंवा बांधकामधारकाची एकाहून अधिक बांधकामे असतील तरीही त्यांना विकल्पानुसार भूखंड किंवा हस्तांतरणीय विकास हक्क देण्यास पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, अनुज्ञेय पात्रता 40 चौरस मीटरपेक्षा कमी असल्यास देखील हस्तांतरणीय विकास हक्क देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये उपग्रह नकाशात जी बांधकामे अस्तित्वात नव्हती, मात्र 2013-14 च्या प्रत्यक्ष सर्वेक्षणात जी अस्तित्वात होती त्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे. याबरोबरच गावठाणात बांधकामधारक राहत नसल्यास नोकरी,धंद्यानिमित्त इतरत्र राहत असल्याचा पुरावा ग्राह्य धरून भूखंड वाटप करण्यात येते. ही सवलत गावठाणाबाहेर असलेल्या बांधकामांनाही लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्त बांधकामधारकांना वाटप करण्यात आलेले भूखंड हे भाडेपट्टा करारावर न देता पूर्ण मालकी तत्वावर देण्याबाबतस्वतंत्ररित्या निर्णय घेण्यात येणार आहे, तसेच राज्यावर वित्तीय भार पडणार नाही अशा मागण्या मान्य करण्याचे अधिकार नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला. याबरोबरच १ ऑक्टोबर 2017 पासून घरभाडे योजना लागू करण्यास व जानेवारी 2017 पूर्वी निष्कासित केलेल्या बांधकामधारकांना 18 महिन्यांचे भाडे देय करण्यासह वाघिवली गावातील बांधकामधारकांनाही तो लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

Previous Post

मुंबईऐवजी दिल्लीतील तुरुंगात मला हलवा

Next Post

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Next Post
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

रस्त्यांवरील खड्डे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत बुजवावेत  – चंद्रकांत पाटील

रस्त्यांवरील खड्डे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत बुजवावेत - चंद्रकांत पाटील

कर्जत जामखेड तालुक्यातील 477 किमी रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

कर्जत जामखेड तालुक्यातील 477 किमी रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com