• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2017

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील रहावे – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी  पोलिसांनी संवेदनशील रहावे  – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सवानिमित्त तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई – राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.   पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, जयेंद्र साळगावकर आदी उपस्थित होते.

 गणेश स्थापना तसेच विसर्जन काळात योग्य त्या उपाय योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच या काळात राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षेचे उपाय योजण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या काळात नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या सूचना पोलीसांनी गणेश मंडळांना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुंबईमधील गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात गणेश मंडळांनी व समन्वय समितीने जनजागृती करावी. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी स्थापनेसाठी गणेशमूर्ती सुट्टीच्या दिवशी आणावी, अशा सूचना पोलीसांनी सर्व सार्वजनिक गणेशमंडळांना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक पोलीस विभागाने गर्दीचे व्यवस्थापन योग्यरितीने करावे. तसेच मंडळांना लागणारे सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पोलीस महासंचालक श्री. माथूर यांनी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

Previous Post

सारसोळेची नारळी पौर्णिमा उत्साहात

Next Post

राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी कामाला लागा : आ. मंदाताई म्हात्रे

Next Post
राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी कामाला लागा : आ. मंदाताई म्हात्रे

राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी कामाला लागा : आ. मंदाताई म्हात्रे

प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपा उमेदवारांचा मतदारांशी थेट संवादावर भर

प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपा उमेदवारांचा मतदारांशी थेट संवादावर भर

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

महापालिका आस्थापनेतील कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्याची इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com