• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2017

राणीबागेतील प्रवेश 1 ऑगस्टपासून महागणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राणीबागेतील प्रवेश 1 ऑगस्टपासून महागणार

मुंबई – भायखळ्यातील राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात वाढ करण्यास, महापालिकेच्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांचा विरोधही तोकडा पडल्याने, नियमानुसार मंगळवार, १ ऑगस्टपासून राणीबागेत प्रवेश मिळविण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढविण्यात आले. मात्र, त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी २ रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी ५ रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने, दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध होता. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या, तसेच बाजार व उद्यान समतीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव रोखता आला नाही. भाजपाचा विरोधही लटका पडल्याने, स्थायी समिती आणि पालिका महासभेची मंजुरी झटपट मिळाली. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतरही त्या महिन्यानंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू करण्याचे ठरले. त्यानुसार, १ ऑगस्टपासून ही नवीन शुल्कवाढ लागू होत आहे. पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपयर्ंत पोहोचतो, असा पालिकेचा दावा आहे. मात्र, राणीबागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे.

असे असतील नवे दर

  • १२ वर्षांवरील प्रौढ व्यक्तीकरिता प्रत्येकी ५० रुपये
  • ३ ते १२ वर्षांपर्यत मुलांसाठी प्रत्येकी २५ रुपये
  • १२ वर्षांवरील २ प्रौढ व्यक्ती व ३ ते १२ वर्षांपर्यत २ मुलांसाठी १०० रुपये
  • खासगी शाळांतील ३ ते १२ वर्षे वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणा-या शालेय विद्यार्थ्यांंसाठी प्रत्येकी १५ रुपये
  • गटासोबत येणा-या प्रौढ व्यक्तींकरिता प्रत्येकी ५० रुपये
  • खासगी शाळांतील १२ वर्षांवरील वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणा-या विद्यार्थ्यांंकरिता प्रत्येकी २५ रुपये
  • गटासोबत येणा-या प्रौढ व्यक्तींकरिता प्रत्येकी ५० रुपये
  • परदेशी अभ्यागत १२ वर्षांवरील प्रौढ व्यक्तींकरिता प्रत्येकी ४०० रुपये
  • परदेशी अभ्यागत ३ ते १२ वर्षांपयर्ंत मुलांकरिता प्रत्येकी २०० रुपये
  • महापालिका शाळांतील विद्यार्थी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य प्रवेश
  • दुचाकी वाहनाकरिता प्रत्येकी ५ रुपये
  • चारचाकी वाहनाकरिता प्रत्येकी २० रुपये
  • बससाठी प्रत्येकी ४० रुपये
  • साध्या कॅमे-यासाठी प्रत्येकी १०० आणि व्हिडीओ शूटिंगसाठी प्रत्येकी ३०० रुपये
Previous Post

घणसोली नोडमधील लोडशेडींगच्या समस्येला विधानसभा अधिवेशनात फुटली वाचा

Next Post

वनौषधी वृक्ष संवर्धनाचा रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचा संकल्प

Next Post
वनौषधी वृक्ष संवर्धनाचा रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचा संकल्प

वनौषधी वृक्ष संवर्धनाचा रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचा संकल्प

आपले वर्तमान कर्तुत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करा

आपले वर्तमान कर्तुत्व भारतमातेच्या चरणी समर्पित करा

समाजाच्या प्रत्येक घटकाला निवडणुकीत प्राधान्य देणार –  आ. नरेंद्र मेहता

केंद्राप्रमाणे मीरा भाईंदरचे मतदार भाजपाला एकहाती सत्ता देतील : आ. नरेंद्र मेहता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com