• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2017

साथीच्या आजारांविषयी प्रभाग 82, 84 मध्ये घरटी तसेच वाणिज्यिक कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याची काँग्रेसची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
साथीच्या आजारांविषयी प्रभागामध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775

नवी मुंबई : साथीच्या आजारांविषयी प्रभाग 82, 84 मध्ये घरटी तसेच वाणिज्यिक कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी काँग्रेसचे स्वंय व रोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीकिनारी व खाडीअंर्तगत भागात भराव टाकून झालेली आहे. पावसाळ्यात दरवर्षी नवी मुंबईत दरवर्षी ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. दवाखान्यात सध्या तापाचे व रूग्णालयात मलेरियाचे तसेच स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण दिसून येवू लागले आहेत. साथीच्या आजार होण्यापेक्षा हे आजार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हितावह आहे. प्रभागातील रहीवाशांना साथीच्या आजाराविषयी मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने रहीवाशांकरिता साथीच्या आजारांविषयी लवकरात लवकर मार्गदर्शन मोहीम सुरू करावी. घरामध्ये काय असावे, काय नसावे, अडगळीच्या वस्तू कशा हानीकारक आहे, पाणी साचू नये, आजार अंगावर काढू नये, सोसायटी आवारात पाणी साचेल असे खड्डे असू नये, डासांना पोषक वातावरण निर्मितीस मदत करू नये याबाबत आपण घरटी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. याशिवाय चौकाचौकात तसेच परिसरात अन्य ठिकाणी हॉटेल, किराणा माल दुकाने व अन्य दुकाने अशा वाणिज्यिक वापराच्या ठिकाणीही मार्गदर्शन करावे. याशिवाय पथनाट्यातून व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, भित्तीपत्रकेही जागोजागी लावण्यात यावी. परिसरातील रहीवाशांच्या आरोग्य रक्षणासाठी साथीच्या आजाराविरोधात पालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असल्याची अपेक्षा रवींद्र सावंत यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
रहीवाशांना अल्प प्रमाणात का होईना साथीच्या आजारांना लागण झाली आहे. उद्या या आजारांचा उद्रेक होवून हानी होण्यापेक्षा समस्येचे गांभीर्य लक्षात घेता आपण संबंधितांना साथीच्या आजाराविषयी प्रभाग 82,84 मधील नेरूळ सेक्टर 2 व 4 परिसरात आणि जईनगरच्या सेक्टर 24 व 25 परिसरात व्यापक प्रमाणावर मार्गदर्शन मोहीम उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा थेट मतदारांच्या सुचनांच्या आधारे

Next Post

नेरूळ पूर्वेेकडील फळ-भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आमदार मंदाताई म्हात्रेंचा सुसंवाद

Next Post
नेरूळ पूर्वेेकडील फळ-भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आमदार मंदाताई म्हात्रेंचा सुसंवाद

नेरूळ पूर्वेेकडील फळ-भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांशी आमदार मंदाताई म्हात्रेंचा सुसंवाद

रोटरी क्लब पनवेल सनराईजचा सामाजिक प्रकल्पांचा षटकार

रोटरी क्लब पनवेल सनराईजचा सामाजिक प्रकल्पांचा षटकार

थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

ऐतिहासिक नव्हे, राज्याला काळीमा फासणारी कर्जमाफी !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com