• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 21, 2016

आयुक्तसाहेब घणसोली कॉलनीला भेट कधी देणार?

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

श्रीकांत पिंगळे

घणसोली कॉलनीत ‘वॉक विथ कमिशनर’ अभियान राबविण्याची मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडेंची मागणी

नवी मुंबईः ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाव्दारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी थेट सुसंवाद साधत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घणसोली कॉलनीवासीयांकडे पाठ फिरवली आहे, असे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया ‘मनसे’चे नवी मुंबई शहर सचिव संदिप गलुगडे यांनी व्यक्त केली.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे समस्त नवी मुंबईकरांच्या समस्या जाणून घेत आहेत. ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक नागरिकांच्या समस्या निकाली देखील लागत आहेत. मात्र, घणसोली कॉलनीमध्ये अद्याप ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम न झाल्याने ‘घणसोली कॉलनी विभाग महापालिका कार्यक्षेत्रात येतो का?, या विभागातील समस्या मार्गी लागतील का?, असे प्रश्‍न घणसोली कॉलनी मधील अनेक नागरिकांना सतावत आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अजुनपर्यंत तरी घणसोली कॉलनीवासीयांकडे पाठ फिरवली असल्याने घणसोली कॉलनी विभाग महापालिका क्षेत्रातच येत नाही, असा घणसोली कॉलनीतील रहिवाशांचा समज होत आहे. त्यामुळेच इतर विभागांमध्ये दुसर्‍यांदा ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पाऊल ठेवत असताना घणसोली कॉलनी विभागामध्ये मात्र एकदाही यायची इच्छा त्यांना झालेली नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जर घणसोली कॉलनी विभागात येण्याचा बेत आखला असता, तर किमान त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने तरी अधिकारी कामाला लागले असते आणि घणसोली कॉलनीतील निम्म्याहून अधिक समस्या सुटल्या असत्या. मात्र, अद्याप पर्यंत तरी तसे झालेले नाही हेच घणसोली कॉलनीतील रहिवाशांचे दुर्भाग्य आहे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनामध्ये संदिप गलुगडे यांनी नमूद केले आहे.
महापालिका आयुक्तच जर एखाद्या विभागाकडे पाठ फिरवत असतील आणि मुलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत असेल तर महापालिकेचा कर तरी का भरावा?, असा साधारण प्रश्‍न घणसोली कॉलनीवासीयांना पडलेला आहे. त्यामुळे समस्त घणसोली कॉलनीवासीयांनी आजवर महापालिकेला भरलेल्या कराची तरी परतफेड होणार आहे काय?, याच प्रश्‍नाचे उत्तर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपेक्षित आहे. ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची प्रतिक्षा घणसोली कॉलनीवासीय करीत आहेत, असे संदिप गलुगडे यांनी सांगितले.

Previous Post

सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा सत्कार

Next Post

२० वर्षात प्रथमच परिवहन सभापती गेले आसूडगाव आगाराच्या पाहणीला

Next Post
२० वर्षात प्रथमच परिवहन सभापती गेले आसूडगाव आगाराच्या पाहणीला

२० वर्षात प्रथमच परिवहन सभापती गेले आसूडगाव आगाराच्या पाहणीला

लोकनेते गणेशजी नाईक, तुमच्या नगरसेवकांना आता आवारा!

लोकनेते गणेशजी नाईक, तुमच्या नगरसेवकांना आता आवारा!

गायमुख खाडीत पडलेला ठाण्याचा पोलीस हवालदार बेपत्ताच

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com