• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 16, 2016

पोलिस, रेल्वे व सिडकोच्या उदासिनतेमुळे नेरूळ रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बनले तळीरामांचा अड्डा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पोलिस, रेल्वे व सिडकोच्या उदासिनतेमुळे नेरूळ रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बनले तळीरामांचा अड्डा

नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात. अनेक वेळा महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. दारू विकणारे व पिणार्‍यांना पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणार्‍या रेल्वे स्टेशनमध्ये नेरूळचाही समावेश होतो. नेरूळ पश्चिमेला माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची वस्ती आहे. येथील जवळपास १ लाख नागरिक रोज रेल्वेने ये -जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच सिडकोने मद्यविक्री करणार्‍यांना दुकानाची विक्री केली आहे. जवळपास एक वर्षापासून येथे खुलेआम मद्यपान सुरू आहे. दारू दुकानदाराने येथे मद्यपान करण्यास मनाई असल्याचा फलक लावला आहे. परंतु तो फक्त औपचारीकता म्हणून. येथे दारू विकणार्‍यांना सोडा, पाणी पुरविण्यासाठी एकास जागा भाडेतत्वावर दिली आहे. चकण्यासाठी लागणार्‍या वस्तू मिळतील याची सोय केली आहे. दारू पिण्यासाठी ग्लास उपलब्ध करून दिले जात आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ पाच तासामध्ये तब्बत ५०० ते ६०० जण येथे मद्यपान करत आहेत. गुंड प्रवृत्तीचे काही तरूण रेल्वेतून प्रवासी बाहेर येवू लागले की प्रवेशद्वारावर उभे राहतात व प्रवाशांसमोर दारू पितात. कोणी या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण केली जात आहे. येथील जिन्यांपासून मोकळ्या जागेवरही तळीरामांनी बस्तान मांडलेले चित्र दिसू लागले आहे.
नेरूळ स्टेशनच्या पश्चिमेला सायंकाळी ६ ते ११ दरम्यान जवळपास २५ हजार प्रवाशी येत असतात. यामध्ये ८ ते १० हजार महिलांचा समावेश आहे. अनेक टपोरी तरूण दारू पिऊन महिलांची छेड काढत आहेत. महिलांकडे पाहून शेरेबाजी करत आहेत. यामुळे अनेक महिलांनी या प्रवेशद्वाराकडून येण्याचे बंद केले आहे. एक वर्षापासून सुरू असलेल्या या अवैध प्रकाराकडे पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच तास येथे उभे राहून पाहणी केली असता रोज दोन गोणी भरून बाटल्या व ग्लास जमा होत आहेत. रात्री ११ नंतर यामधील बाटल्या भंगारवाला घेऊन जातो. दारूच्या दुकानासमोरील सिडकोच्या केबीनमध्येही अतिक्रमण झाले आहे. तेथे कचर्‍याचे डबे ठेवण्याचे गोदाम तयार केले आहे. यापुर्वी अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु काहीच कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये विशेषत: महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

***
कायदा हातात घ्यावा लागेल
स्थानकात सुरू असलेल्या मद्यपानाविषयी कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांची छेड काढली जात आहे. पोलीस येथील मद्य विक्री व मद्यपान थांबविणार नसतील तर आम्हाला कायदा हातात घेऊन हे प्रकार थांबवावे लागतील असा इशारा महिलांनी दिला आहे. महिलांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतरच कारवाई करणार का असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

***
पाच तासात दोन गोणी बाटल्या जमा
नेरूळ परिसरातील सामाजीक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनमधील अनधिकृत ओपन बारचे वास्तव सर्वांसमोर मांडण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत येथील परिस्थितीचे सर्वेक्षण केले. रोज दोन गोणी बाटल्या जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील पायर्‍या व बाजूच्या दुकानांजवळही मद्यपींच्या मैफिली सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मद्यपींसाठी सोडा, ग्लास, पाणी पुरविले जात आहेत. पानटपरीही सुरू झाली असल्याचे निदर्शनास आले. येथूनच अनेक वेळा पोलीस व सुरक्षा रक्षकत जात असतात परंतु ते बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

मध्य रेल्वेवर रविवारी 10 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Next Post

पार्किगच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू – आयुक्त मुंढे

Next Post
पार्किगच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू – आयुक्त मुंढे

पार्किगच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू - आयुक्त मुंढे

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मल सागर तट अभियान

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मल सागर तट अभियान

मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

वीजवाहिन्या भूमीगत करण्याच्या, जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्ती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com