• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2016

छगन भुजबळ यांच्या अटकेचा नवी मुुंबईत निषेध

adminbyadmin
in नवी मुंबई
0
छगन भुजबळ यांच्या अटकेचा नवी मुुंबईत निषेध


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सूडबुध्दीने गोवून त्यांना अटक केल्याचा जळजळीत निषेध आज नवी मुुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने वाशीतील शिवाजी चौकात करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी या निषेध कार्यक्रमाचे नेतृत्व केले.
शिवाजी चौकात मोठया संख्येने जमलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी युती सरकार हाय हाय, छगन भुजबळ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. युती सरकार राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूडबुध्दीने आणि हेतुपुरस्सर अडकवित असल्याचा आरोप डॉ.नाईक यांनी केला. ते म्हणाले की, या निषेधाच्या माध्यमातून आम्ही युती सरकारला सांगू इच्छितो की, मत्सराचे राजकारण थांबवा. तुमची सत्ता काही आयुष्यभर राहणार नाही. पक्ष जेव्हा हाक देईल तेव्हा कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या मागे आणि अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन करतानाच नवी मुंबईतील कार्यकर्ते अशा प्रकारे नेत्यांच्या मागे उभे राहतात हे आजच्या उपस्थितीवरुन स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार यांनी हल्लाबोल करीत हे युती सरकार नसून बेकार सरकार असल्याचे सांगितले. स्वतःचे घोटाळे बाहेर येत असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांना सूडबुध्दीने अडकवून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम हे सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. भाजपाचा खासदार करोडो रुपयांची बँकांची लूट करुन परदेशात पळून जातो आणि राष्ट्रवादीचे नेते युती सरकारने केलेल्या आरोपांच्या चौकशीला परदेशातून प्रामाणिकपणे सामोरे जातात. त्यांना मुददाम त्रास देवून अटक करण्यात येते, असा हल्लाबोल माजी महापौर सागर नाईक यांनी केला. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, तालुका अध्यक्ष राजू शिंदे, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, नगरसेविका संगीता बोर्हाडे, व्यापारी संघटनेचे नेते दिनेश पारख यांनी आपल्या भाषणात सूडबुध्दीने सुरु असलेल्या युतीच्या राजकारणाचा निषेध केला.

Previous Post

भुजबळांना जामीन नाही, २ दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

Next Post

भुजबळांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next Post
भुजबळांना जामीन नाही, २ दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

भुजबळांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

२७५ कोटी रुपये घेऊन विजय माल्या पसार

किंगफिशर हाऊसला एकही खरेदीदार नाही

मुंबई लोकल: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

लोकलखाली २४ तासात १७ जणांचा चिरडून बळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com