• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 6, 2016

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक !

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक !

मुंबई : 8 फेब्रवारी रोजी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कुठे आहेत त्याचा तपशील खालील प्रमाणे
* मध्य रेल्वे-
कुठे – कल्याण-ठाणे यांदरम्यान अप धिम्या मार्गावर
कधी – सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान कल्याण आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावणार्‍या सर्व गाडया अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडया ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना डोंबिवली किंवा ठाणे स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच डाऊन व अप मार्गावर धावणार्‍या सर्व जलद गाडया त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. तर सर्वच सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील.

* पश्‍चिम रेल्वे-
कुठे – भाईंदर ते वसई रोड यांदरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर
कधी – मध्यरात्री 00.30 ते पहाटे 4.30 वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान भाईंदर ते वसई यांदरम्यानच्या सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावरून चालवल्या जातील. यामुळे काही गाडया रद्द असतील. रविवारी दिवसभर पश्रि्चम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.

* हार्बर मार्ग-
कुठे – वाशी-बेलापूर दरम्यान अप आणि डाउन मार्गावर
कधी – पहाटे 2.00 ते सकाळी 10.00 वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान या स्थानकांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. मात्र मुंबई-वाशी-मुंबई आणि पनवेल-बेलापूर-पनवेल यांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

ब्लॉकनंतर मुंबईहून पनवेलसाठी पहिली गाडी सकाळी 8.23 वाजता सुटेल. पनवेलहून मुंबईसाठी पहिली गाडी सकाळी 9.10 वाजता निघेल. ठाण्याहून पनवेलसाठी पहिली गाडी 11.12 वाजता निघेल आणि पनवेलहून ठाण्यासाठी पहिली गाडी 9.02 वाजता सुटेल.

* ‘मरे’वर दुसरी ‘दोन आसनी’ लोकल दाखल
धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वाढत्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चालवलेल्या दोन आसनी लोकलचे प्रवशांकडून स्वागत करण्यात आल्याने शुक्रवारी मध्य रेल्वेने दुसरी लोकल चालवली. या गाडीच्या डबा क्रमांक 4, 6, 9 आणि 10 या डब्यात दोन आसनी व्यवस्था करण्यात आली. या दोन आसनी व्यवस्थेमुळे डब्यातील प्रवासी क्षमता 593 ऐवजी 651 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या आणि चौथ्या डब्यात मेट्रोप्रमाणे आसनव्यवस्था बसवण्यात आली असल्याचे रेल्वे अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

Previous Post

कचरा डेपो आगीबाबत आयआयटीचा मुंबई महापालिकेला सल्ला

Next Post

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना तातडीने पदमुक्त करा

Next Post
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना तातडीने पदमुक्त करा

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना तातडीने पदमुक्त करा

विक्रोळीतील सिलिंडर स्फोट, लहान मुलांसह एकाच घरातील तिघांचा मृत्यू

विक्रोळीतील सिलिंडर स्फोट, लहान मुलांसह एकाच घरातील तिघांचा मृत्यू

शनि चौथर्‍यावर महिला प्रवेशाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

शनि चौथर्‍यावर महिला प्रवेशाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com