• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 25, 2015

ऑस्ट्रेलियाला विजयासह मालिका जिंकण्याची संधी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ऑस्ट्रेलियाला विजयासह मालिका जिंकण्याची संधी

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्‍या कसोटीला शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. विजयी सलामी देणार्‍या यजमानांना आणखी एका विजयासह मालिका जिंकण्याची संधी आहे.
घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवणे, नक्कीच सोपे नाही. स्टीव्हन स्मिथ आणि सहकार्‍यांनी होबार्ट कसोटी तीन दिवसांत डावाने जिंकताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऍडॅम वोग्ज आणि शॉन मार्शची दमदार फलंदाजी आणि त्यांना वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुड आणि जेम्स पॅटिन्सन ऑफब्रेक नॅथन लियॉनची मिळालेली सुरेख साथ यजमानांच्या मोठया विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. कर्णधार स्मिथला पहिल्या कसोटीत मोठी खेळी करण्यात अपयश आले. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे मेलबर्नवर स्मिथला सूर गवसेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला वाटतो. यजमानांना गोलंदाजीतही चिंतेचे कारण नाही. मात्र हॅझ्लेवुडला पीटर सिडल आणि जेम्स पॅटिन्सनची तशीच समर्थ साथ मिळायला हवी.
ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवला तरी प्रतिस्पर्ध्याकडून त्यांना अजिबात चुरस पाहायला मिळाली नाही. यजमानांच्या बहारदार फलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचे तीनतेरा वाजले. डावखुरा फिरकीपटू जोमेल वॅरिकनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तरी त्याला दीडशेहून अधिक धावा मोजाव्या लागल्या. फलंदाजीतही डॅरेन ब्राव्होने पहिल्या डावात तसेच क्रेग ब्राथवेटने दुसर्‍या डावात खेळपट्टीवर थांबण्याची थोडी हिम्मत दाखवली. फलंदाजी उंचावली नाही तर पाहुण्यांचे काही खरे नाही.
**‘बॉक्सिंग डे’ कसोटीची उत्सुकता**
नाताळ सणादरम्यान खेळल्या जाणार्‍या कसोटीला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हटले जाते. दरवर्षाप्रमाणे यंदाच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. १९९८पासून खेळल्या जाणारी कसोटी निकाली ठरल्याचाच इतिहास आहे. अपवाद फक्त गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या कसोटीचा आहे. २०००नंतर ऑसट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत केवळ दोनदा पराभूत व्हावे लागले आहे.
वेळ : (शनिवारी) पहाटे ५ वाजल्यापासून.

Previous Post

शनिवारी न्यूझीलंड-श्रीलंका पहिली वनडे!

Next Post

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

Next Post
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बोकड, उपविजेत्यांना दहा गावठी कोंबड्या!

कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बोकड, उपविजेत्यांना दहा गावठी कोंबड्या!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com