• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2015

अवघ्या ७९ रन्समध्ये द. आफ्रिकेची टीम गारद

adminbyadmin
in देश - विदेश
0
अवघ्या ७९ रन्समध्ये द. आफ्रिकेची टीम गारद

नागपूर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. पहिल्या डावात अवघ्या ७९ रन्समध्ये दक्षिण आफ्रिकेची अख्खी टीम गारद झालीय.
फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी मार्‍यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. भारताचा पहिला डाव २१५ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र, अश्विन आणि जडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव अवघ्या ७९ धावांत आटोपला. अश्विनने पाच तर जडेजाने चार बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
पहिल्या दिवसअखेर दोन बाद ११ वरुन खेळताना दुसर्‍या दिवशी आफ्रिकेला केवळ ६८ धावा करता आल्या. त्या मोबदल्यात मात्र पाहुण्यांनी तब्बल आठ विकेटस् गमावल्या. पाहुण्यांच्या संघातील भरवशाच्या फलंदाजांनीही यावेळी साफ निराशा केली. आफ्रिकेकडून जेपी ड्युमिनीने (३५ रन्स) एकटा किल्ला लढवण्यचा प्रयत्न केला. मात्र, त्याला इतर फलंदाजांनी साथ लाभली नाही. त्यामुळे पाहुण्यांच्या संघाला पहिल्या डावात शंभरीही गाठता आली नाही. तत्पूर्वी, पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २१५ धावा केल्या होत्या.
या सामन्यामध्ये, भारतानं दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ वर्षांपूर्वीचा एक लज्जास्पद रेकॉर्डही मोडीत काढलाय. नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १२ धावांत आफ्रिकेने तब्बल पाच गडी गमावले. यापूर्वी १९०२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने १४ धावांत पाच गडी गमावले होते. ही त्यांची सगळ्यात खराब कामगिरी होती.

Previous Post

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान

Next Post

गाढवांच्या बाजारात ‘लालू-नितीश’ जोडी ’हिट’

Next Post

गाढवांच्या बाजारात ‘लालू-नितीश’ जोडी ’हिट’

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

महापालिकेत कंत्राटी कामगारांची भरती न करता कायम कामगारांची भरती करणेची कॉंग्रेसची मागणी

मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

मुलीवर वर्गमित्रांनी बलात्कार करून घटनेचा तयार केला व्हिडिओ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com