• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2015

रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग आयसिसच्या खात्म्यासाठी एकटवलं!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग आयसिसच्या खात्म्यासाठी एकटवलं!

पॅरिस/मॉस्को: पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय. दुसर्‍या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत.
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या खात्म्यासाठी रशिया आणि फ्रान्सनं एकत्रित कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही देशांनी मंगळवारी आयसिसच्या सीरिया आणि इराकमधल्या तळांवर जोरदार बॉम्ब वर्षाव केला. रशियानं गेल्या दोन महिन्यांपासून आयसिस विरोधात हल्ले सुरू केलेत.
त्यानंतर इजिप्तमध्ये एक रशियन नागरी विमान आयसिसच्या दहशतवाद्यांनी पाडलं. त्यात दोनशे प्रवासी मृत्यूमुखी पडले. त्यापाठोपाठ फ्रान्सची राजधानी पॅऱिसमध्ये आयसिसनं हल्ला केला. त्यात 130 हून अधिक जण ठार झाले. त्यामुळे दोन्ही देशांनी इसिसचं अस्तित्व संपवण्याचा विडा उचललाय. त्याअंतर्गतच यापुढे हल्ले करताना दोन्ही देशांच्या वायू सेना समन्वय ठेवतील असा करार करण्यात आलाय.
सीरियात रशियानं टीयू-160 ब्लॅकजॅक आणि टीयू-95 बियर हे बॉम्बफेकी विमान तैनात केलेत. आयसिसच्या ठिकाणांवर या विमानांमध्ये हल्ले सुरु आहेत. रशियानं पहिल्यांदाच आपल्या कमांड सेंटरचा व्हिडीओ जारी केलाय. या सगळ्या हल्ल्यांवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची करडी नजर आहे. रशियाचं विमान बॉम्बनं उडवणारे आयसिसचे दहशतवादी कुठेही लपले असतील तर त्यांना शोधून कठोर शिक्षा देणार असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय.
विमानावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांसाठी रशियानं पाच कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 330 कोटी रुपये बक्षिस जाही केलयं. 31 ऑक्टोबरला रशियाचं प्रवासी विमान दहशतवाद्यांनी इजिप्तच्या सिनाई भागात बॉम्बच्या साहाय्यानं उडवलं होतं. इजिप्तवरुन रशियांच्या सेंट पीटर्सबर्ग इथं येणार्‍या या विमानातील सर्व 224 प्रवासी ठार झालेत. विमानाच्या अवशेषांमध्ये बॉम्ब आणि दारुगोळ्याचे अंश सापडलेत.
पॅरिसमध्ये हाहाकार माजवणार्‍या आयसिसविरोधात फ्रान्सनंही दंड थोपटलेत. निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या आयसिसला धडा शिकवण्यास फ्रान्सनं सुरुवात केलीय. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 24 तासांत दुसर्‍यांदा फ्रान्सनं आयसिसच्या ठिकाणांना टार्गेट केलंय. फ्रान्सचे 12 फायटर जेट्स सातत्यानं सीरियात आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करतायत. फ्रान्सला यांत अमेरिकेचीही मदत मिळतेय. अमेरिकेच्या जॉर्डन आणि युएई एअरबेसचा यासाठी उपयोग होतोय. फ्रान्सच्या या हल्ल्यात आयसिसचे कमांड पोस्ट. ट्रेनिंग कॅम्प, भरती केंद्र आणि हत्यार डेपो उद्धवस्त झालंय.
आयसिसचा वाढता धोका लक्षात घेऊन भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. अमेरिका आणि युरोपला आयसिसकडून मिळालेल्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्रालयानं देशात अलर्ट जारी केलाय. दिल्लीतले दूतावास आणि उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही देण्यात आलेत. राज्यांनाही सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आयसिस मदत करत असल्याचं गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे आयसिसचा धोका केवळ भारतालाच नसून तर सार्‍या जगाला आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

Previous Post

कुकशेत गावात दिपावली उत्सवास प्रारंभ!

Next Post

छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Next Post

छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

महापालिका कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करा!

** शुक्रवारी पाणी नाही, पाणी जपून वापरा! **

** शुक्रवारी पाणी नाही, पाणी जपून वापरा! **

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com