• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 24, 2015

‘माझे पती सौभाग्यवती’ २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘माझे पती सौभाग्यवती’ २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर

मुंबई : झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका ‘माझे पती सौभाग्यवती’ येत्या २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय.
या मालिकेची कथा आहे वैभव मालवणकर या स्ट्रगलर अभिनेत्याची. एक मोठा नट बनण्याचं स्वप्न घेऊन तो या मुंबईत आलाय. अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. याही परिस्थितीत मात्र खचून न जाता तो आपलं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत रोज धक्के खातोय. त्याच्या या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी लक्ष्मी. आपल्या पतीनं खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी काटकसरीचा संसार ती मोठ्या नेटानं चालवतेय.
याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. पण संघर्ष हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच बनलाय त्यामुळं या संधीसोबतच येतो एक आगळा वेगळा संघर्ष तो म्हणजे स्वतःची मूळ ओळख लपविण्याचा. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या वैभवला पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी. पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्व दुर्लक्षित करू पाहणार्‍या त्याच्या आयुष्याला या कामामुळं कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून.
‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळी यांच्या अल्ट्रा क्रिएशन्स या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर पत्नी लक्ष्मीच्या भूमिकेत नंदिता धुरी ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. याशिवाय अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनिस, स्नेहा माजगावकर, अद्वैत दादरकर असे अनेक लोकप्रिय कलाकारही या मालिकेत असणार आहेत.
केवळ बाईचं मन समजून घेण्याचा नाही तर तिच्या अंतरंगात डोकावण्याचा अतिशय वेगळा प्रयत्न ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेमधून होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे फक्त झी मराठीवर.

Previous Post

राज्यपालांनी संजयचा दयेचा अर्ज फेटाळला

Next Post

जुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

Next Post
जुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

जुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

शिवसेनेच्या वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्षाला अटक

सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला सातव्या दिवशीही श्रीगणेशमुर्तींचा विसर्जन सोहळा

सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला सातव्या दिवशीही श्रीगणेशमुर्तींचा विसर्जन सोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com