Home Uncategorized पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास विभाग अधिकारी कार्यालयावर २६ एप्रिलला बिसलेरी मोर्चा...

पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास विभाग अधिकारी कार्यालयावर २६ एप्रिलला बिसलेरी मोर्चा : मनोज मेहेर

0 206

नवी मुंबई : सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास महापालिकेच्या नेरूळ  विभाग अधिकारी कार्यालयावर बिसलेरी मोर्चा काढणार असल्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनाही निवेदन देवून कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असतानाही सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर ६ च्या रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रात्री पालिका प्रशासनाकडून ३ तास पाणी येत असे, आता जेमतेम एक तासच पाणी येत आहे. बायपास लाईनला सर्वात जास्त पाणीपुरवठा कमी येत आहे. दोन दिवसापासून जलकुंभाच्या (टाकीच्या) लाईनकडूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होवू लागला आहे. कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पाणी कमी पडू लागले आहे. २४ तास पाणी यामुळे घरातील हंडे नामशेष झाले आहेत.  २५ एप्रिलपर्यत या समस्येचे निवारण न झाल्यास कोरोनाबाबतीत महापालिका प्रशासनाने आखून दिलेल्या सर्वच नियमांचे पालन करून २६ एप्रिलला नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयावर स्थानिक रहीवाशांचा मोर्चा काढण्याचा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

NO COMMENTS

Leave a Reply