Home Uncategorized महिला दिनानिमित्त निर्मला महिला मंडळाच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला दिनानिमित्त निर्मला महिला मंडळाच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 71

नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग 82 व 84 या प्रभागातील नेरूळ सेक्टर 2,4 व जुईनगर नोडमधील महिलांसाठी निर्मला महिला मंडळाच्यावतीने आयोजित विविध उपक्रमांना महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई महिला जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर व नेरूळ तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. गौरी रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेे.
निर्मला महिला मंडळाच्या या नवीन उपक्रमाला स्थानिक विभागातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योगा प्रशिक्षण,संस्कर भारती रांगोळी आणि चॉकलेट आदींचे प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाणार आहेे. त्याचा आज शुभारंभ झाला. यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अन्यही उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेे. यावेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन (पॅड) व मास्कचे वितरण करण्यात आलेे. यावेळी सौ. मंगल बागडे, सौ. सारिका धोंडे, सौ. स्वाती खिलारे, सौ. रेशमा पडवळ, सौ. शीतल सावंत, सौ. विमल सोनवणे,सौ. अश्विनी पंडित, सौ. दीपाली नलावडे, पूनम कांबळे आदी उपस्थित होत्या.

NO COMMENTS

Leave a Reply