Home Uncategorized महापालिका मुख्यालयाजवळील तलावात बेलापुर ग्रामस्थांना पुन्हा दिसली मगर

महापालिका मुख्यालयाजवळील तलावात बेलापुर ग्रामस्थांना पुन्हा दिसली मगर

0 159

नवी मुंबई : महापालिका मुख्यालयाजवळील तलावामध्ये पुन्हा एकदा बेलापुरच्या ग्रामस्थांना मागील तीन-चार दिवसापासून मगरीचे दर्शन होवू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  दिसू लागले आहे.

या तलावात बेलापुरच्या ग्रामस्थांना नेहमीच मगरीचे दर्शन होत असते. याबाबत सप्टेंबर २०२० मध्ये ग्रामस्थांनी वनविभागाकडे या मगरीची तक्रार केली असता वनविभागाने ही तक्रार नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे हस्तांतरीत केली. मात्र त्यावेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या तलावात कोणतीही मगर नसून  ती खाडीमध्ये निघून गेले असल्याची शक्यता व्यक्त केली. महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस नेहमीच मगरीचे दर्शन होत असते. आता पुन्हा तीन चार दिवसापासून मगरीचे दर्शन होवू लागले आहे. ग्रामस्थांकडून या मगरीचे फोटो व  व्हिडीओ सोशल  मिडियावर व्हायरल होवू लागले आहेत. बेलापुरमधील पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस दिसणारी मगर पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

NO COMMENTS

Leave a Reply