Home Uncategorized प्रभाग ९६ मध्ये नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

प्रभाग ९६ मध्ये नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

0 78

नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ ए मधील प्रथमेश सोसायटीमागील रस्त्याच्या कामास महापालिका प्रशासनाकडून शुभारंभ करण्यात आला. या प्रभागाच्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी पाच वर्षे महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील चार सभागृहात म्हणजेच २० वर्षे जे काम इतरांना जमले नाही ते नगरसेविका रूपाली भगत यांनी करून दिल्याचे समाधान स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या सेक्टरमधील प्रथमेश सोसायटीमागील रहीवाशांना नव्याने रस्ता मिळावा यासाठी नगरसेवकपदाच्या कालावधीत सौ. रूपाली किसमत भगत यांनी पालिका आयुक्त व विभाग अधिकारी कार्यालय व अन्य संबंधितांकडे लेखी निवेदने सतत देवून तसेच संबंधितांच्या भेटीगाठी घेवून मागणीचा पाठपुरावा केला. अखेरिला हा नव्याने रस्ता मंजूर करण्यात आला व या रस्त्याच्या कामास महापालिका प्रशासनाने सुरूवातही केली.
प्रथमेश सोसायटी पाठीमागील नवीन रस्त्याचे कामाला सुरूवात करताना जनसेवक गणेश भगत, रंगनाथ बारवे, संजय सोलाट, पांडुरंग बेलापुरकर, नाना घोगरे, शांताराम कुऱ्हाडे, अनंत कदम, गोरक्षनाथ गांडाळ, आर.एन.पाटील, जी.एस.मराठे, दत्तात्रेय तोंडे, सिताराम देसाई, संतोष निमसे, सुदाम शिरोळे, रवी तवर, रमेश नार्वेकर,अशोक गांडाळ, ज्ञानेश्वर इंगवले, रवी भगत उपस्थित होते.

NO COMMENTS

Leave a Reply