Home Uncategorized गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमाला फळवाटप

गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमाला फळवाटप

0 79

नवी मुंबई : जनसेवक गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ  सेक्टर १६एमधील जीवनज्योती आशालय या  अनाथाश्रमामध्ये फळवाटप करण्यात आले.

आपल्या वाढदिवसानिमित्त गणेश भगत यांनी सकाळी जावून अनाथाश्रमातील मुलांना स्वत: फळवाटप करून बराच  वेळ  त्या मुलांमध्ये घालविला. आपला आनंद त्या मुलांसोबत व्यक्त  केल्याने इतरांच्या दु:खाची कल्पना समजण्यास मदत होवून त्या घटकाबाबत भरीव कार्य करण्याची नव्याने प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी गणेश भगत यांनी सांगितले. यावेळी अशोक गांडाळ, चंद्रकांत महाजन, अनंत कदम, गोरक्षनाथ गांडाळ, अंबादास गर्जे, रमेश नार्वेकर, वैभव जाधव, रवी भगत उपस्थित होते.

NO COMMENTS

Leave a Reply