Home ई - पेपर्स अजय देवगणचा चित्रपट श्रृती हासनने नाकारला

अजय देवगणचा चित्रपट श्रृती हासनने नाकारला

मुंबई : श्रृती हासनने चक्क अजय देवगणसोबतच्या एका मोठ्या बॅनरचा चित्रपट नाकारलाय. मिलन ल्युथरा सध्या अजय देवगणसोबत ‘बादशाहो‘ हा चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
‘निर्मात्यांशी सुरवातीला झालेल्या चर्चांदरम्यान चित्रपटाच्या कथेवर आणि त्यातील तिच्या भूमिकेबद्दल श्रृती हासन खूश होती. म्हणून तिने तोंडी होकार कळविला होता. परंतु, चित्रपटाच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यापूर्वी तिने अंतिम स्क्रिप्ट पाहण्यासाठी मागितले,‘ असे सूत्रांनी सांगितले.
अंतिम स्क्रिप्ट पाहिले तेव्हा तिला सांगण्यात आलेली भूमिका त्यात नव्हती, त्यामुळे दिग्गज अभिनेते कमल हासन यांच्या या लाडक्या कन्येने सरळ चित्रपट नाकारला.
श्रृतीच्या हातात सध्या बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील मोठे प्रोजेक्ट आहेत. त्या तुलनेत ‘बादशाहो‘च्या स्क्रिप्टमध्ये मोठी भूमिका न मिळाल्याने तिने हा चित्रपट नाकारण्याचा निर्णय घेतला.

SIMILAR ARTICLES

0 658

NO COMMENTS

Leave a Reply