Home ई - पेपर्स ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

नाशिक : देशोन्नती’चे शहर संपादक व ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे (४७) यांचे आज वर्धेतील विनोबा भावे रुग्णालयात निधन झाले. गेल्या पंचेवीस वर्षांमध्ये त्यांनी आपल्या दमदार लेखणीने पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले होते. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातील वृत्तांकनातून मोठा जनसंपर्क त्यांनी तयार केला. विशेष म्हणजे राजकीय, सामाजिक आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसंदर्भातील वृत्तमालिका आणि विश्‍लेषणांच्या माध्यमातून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर आठवड्याभरापासून उपचारही सुरू होते. पण, मंगळवारी (ता.८) रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

SIMILAR ARTICLES

0 658

NO COMMENTS

Leave a Reply