Home ई - पेपर्स

0 1083

योगेश शेटे
नवी मुंबई : बोनकोडेकर नाईक परिवाराच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अविकसित असलेले सारसोळे गाव चांगलेच लक्षात असणार! बामणदेव, सारसोळे जेटी, स्मशानभूमी, पालिका शाळा, वेस यासह अन्य नागरी सुविधा व नागरी समस्या निवारणासाठी सारसोळेचा युवा ग्रामस्थ आणि नेरूळ तालुका कॉंग्रेसचा चिटणिस मनोज मेहेर यांनी महापौर, उपमहापौर, पालकमंत्री सर्वांनाच सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुलांच्या ३ मार्चला दहावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत, तुम्ही ४ मार्चला माझ्या परिसरातील नेरूळ सेक्टर ६मध्ये जाहीर सार्वजनिक कार्यक्रम घेवू नका असे जनता दरबारात उघडपणे सांगत पालकमंत्र्यांच्याच कार्यक्रमाला जाहीरपणे विरोध केला होता. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्या विकासाकरीता महापालिका ते पालकमंत्री सर्वांनाच पाठपुरावा करणारा मनोज मेहेरची बोनकोडेविरोधक अशीच प्रतिमा निर्माण करण्यात आली. परंतु बोनकोडेच्या युवराजाचे व नवी मुंबईच्या ओबामा म्हणून राज्याच्या राजकारणात प्रसिध्द असणार्‍या संदीप नाईकांनी सारसोळेच्या युवा ग्रामस्थांशी राजकारणविरहीत नाते जोडले आहे आणि ते सातत्याने जपलेही आहे. सारसोळे गावच्या यात्रेचे निमत्रंण संदीप नाईकांना देण्यात आले. निवडणूक प्रचारात व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून संदीप नाईक आले. मच्छिमार संस्थेच्या कार्यालयात तब्बल तासभर बसले. सारसोळे ग्रामस्थांशी व नेरूळ सेक्टर सहामधील उपस्थित नागरिकांशी मनमोकळा सुसंवाद साधत संदीप नाईकांनी सारसोळेच्या ग्रामस्थांची आणि नेरूळ सेक्टर सहामधील नागरिकांची मने जिंकली. ना आश्‍वासने, ना पैशाचे वाटप, ओबामाचा स्पष्टवक्तेपणा आणि सारसोळे गावाप्रतीची बोलण्यात जाणवलेली आत्मियता यामुळेच ते शक्य झाले. जे ना. गणेश नाईकांना शक्य झाले नाही, सागर नाईकांना समजले नाही, ते सारसोळेवासियांचे प्रेम फक्त संदीप नाईकांनाच उमगले. त्यामुळेच पुन्हा एकवार यात्रेच्या निमित्ताने संदीप नाईकांचा आणि सारसोळेच्या भोळ्याभाबड्या ग्रामस्थांचा ॠणानुबंध पुन्हा एकवार घट्ट झाला.
निवडणूकांपुरताच संदीप नाईकांचा सारसोळे गावाशी संबंध येत नाही. सारसोळेचे ग्रामस्थ ज्यावेळी अष्टविनायक पदयात्रेला निघतात, त्यावेळी संदीप नाईक आर्वजून किती जण जाणार आहेत, काय अडचण आहे का, याची चौकशी करतात. पदयात्रा सुरू असतानाही वारंवार संपर्क करून ख्यालीखुशाली जाणून घेतात, हे कोणत्याही राजकारण्याने आजवर केले नाही, ते संदीप नाईक सातत्याने करतात. संदीप नाईक आपल्या कामाची कधीही मार्केटींग करत नसल्याने संदीप नाईकांच्या कामाची आजवर पाहिजे त्या प्रमाणात प्रसिध्दी झाली नाही. संदीप नाईक हा माणूस सरळमार्गी आहे. छक्केपंजे संदीप नाईकांना आयुष्यात कधी जमले नाही आणि यापुढेही जमणार नाही. जेमतेम अडीच हजाराच्या आसपास सारसोळेच्या ग्रामस्थांचे मतदान. इतरांनी अगदी बोनकोडेकरांनीही सारसोळेकरांकडे गेल्या काही वर्षात कानाडोळाच केला. सातव्या मजल्यावर लेखी निवेदनाचा पाऊस पाडून टाहो फोडूनही सारसोळेच्या दिशेने कधी मान्यवरांच्या गाड्या वळाल्या नाही. पण सर्वसामान्याचा कळवळा असणारे संदीप नाईक मात्र याला सातत्याने अपवाद ठरले. सारसोळे गावात ग्रामस्थांच्या इमारतींच्या मोजणीचा प्रसंग असो, सर्वप्रथम संदीप नाईक धावून आले आहेत. फोनाफोनी संदीप नाईकांनीच केल्या आहेत. कामानिमित्त सारसोळेचे ग्रामस्थ गेल्यावर पालिका शाळेतील पंखे असो, खाडीतील मासेमारी असो, ओळखपत्र असो, जेटीवरील अंधार, जेटीवरील डेब्रिज यासह अन्य मुद्यांच्या खोलात जावून सारसोळेकरांची आस्थेवाईकपणे विचारपुस बोनकोडेत कोणी आजवर केली असेल तर ती फक्त संदीप नाईकांनीच केली आहे. अन्य गावांकडे गणेश नाईक असतील, पण आमच्याकडे पण संदीप नाईक आहे असे आजपण सारसोळेचे ग्रामस्थ अभिमानाने सांगत आहेत.
सारसोळेच्या यात्रेला संदीप नाईक आले होते काही दिवसापूर्वी. सारसोळेच्या गोरगरीब कोळी मित्रांचे यात्रेचे निमत्रंण स्वीकारून संदीप नाईक आले होते. ही राजकीय भेट नसल्याने पक्षीय कार्यालयात जा, स्थानिक पदाधिकार्‍यांना घ्या, हा प्रोटोकॉल पाळण्याची गरजच नव्हती. संदीप नाईक हा माणूस आपल्या कार्यक्रमाला येणे हीदेखील नवी मुंबईच्या राजकारणात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पण सारसोळेकर सुदाम्यांच्या भेटीला श्रीकृष्ण आला, असे वातावरण सारसोळेचे होते.
भेटीतच सुरूवातीला मी तुमच्याकडे मते मागायला नाही तर तुमच्या यात्रेत सहभागी व्हायला आलो असल्याचे संदीप नाईकांनी स्पष्ट केले. सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहामधील उपस्थित रहीवाशांनी असंख्य प्रश्‍न उपस्थित केले. प्रत्येकाचे समाधान होईपर्यत संदीप नाईकांनी समजावून सांगितले. जेटीचा मुद्दा, बामनदेवाचा मार्ग , गावातील मुलांचा रोजगार, आगरी-कोळी भवनातील कामगारांची ससेहोलपट, क्रिकेट खेळातील अडचणी, गावठाणातील इमारतीची नियमितता सर्वच प्रश्‍नांवर कोणताही आडपडदा न ठेवता चर्चा झाली. काहींनी राजकारणावर टीकेचा सूर आळविताच संदीप नाईकांनी आपण सर्व मित्र आहोत आणि राहणार. तुम्ही तुमच्या सर्व समस्यांचे निवेदन सादर करा आणि निवडणूक संपल्यावर माझ्याकडे कामांचा पाठपुरावा करा. संपर्कात रहा आणि गावाचा कायापालट करून घ्या. मी कामे केल्यावर माझ्या मागे फिरू नका. मुलांच्या कल्याणासाठी व चांगल्या संसारासाठी झटा. दारूच्या आहारी जावू नका. दारूवर होणारा खर्च मुलांवर करा. यापुढे मैदानावर क्रिकेट खेळण्यास कोणी विरोध केलाच तर मी स्वत: तुमच्याबरोबर खेळण्यास येईल, असे संदीप नाईकांनी यावेळी सांगितले.
सिडकोच्या ए टाईपच्या दत्तगुरू या धोकादायक इमारतीचा प्रश्‍न तेथील रहीवाशांनी मांडताच सर्वजण एकत्रित भेटायला या, पावसाळी अधिवेशनातच समस्या निकाली काढू असे संदीप नाईकांनी सांगितले.
प्रत्येक प्रश्‍नाला संदीप नाईक उत्तर देत होते. कोणाच्याही प्रश्‍नाला टाळले नाही. निवडणूकीच्या व्यस्त शेड्यूलमध्ये संदीप नाईक निवांतपणे सारसोळे गावच्या विसाव्याला आले होते. चर्चेच्यावेळी जमलेल्या प्रत्येकाला त्यांनी संदीप खांडगेपाटील यांच्याकडे तुमची निवेदने सादर करा आणि कामाचा रिझल्ट पाहा असे सांगितले.
संदीप नाईक सर्वांच्या समस्या जाणून घेतल्यावरच उठले. नवी मुंबईचा विकास आपणास करायचा असल्याने आपण एकत्रित येवू, मी एकवेळ श्रीमतांचे काम करत नाही, पण गरीबांचे काम पहिले करतो. सारसोळे ग्रामस्थांचे माझ्यावर असलेले पे्रम कायम टिकून राहण्यासाठी तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगताना संदीप नाईकांनी संपर्कात रहा आणि कामे करून घ्या, एवढे सांगून सारसोळेकरांचा निरोप घेतला. यापुढे सारसोळेकरांच्या समस्यांवर आणि बेरोजगारीवर आपण तोडगा काढण्यास पुढाकार घेणार असल्याचे संदीप नाईकांनी सांगितले.
सारसोळे ग्रामस्थांच्यावतीने कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी त्यांचे स्वागत केले. संदीप नाईकांनी आपल्या छोटेखानी भेटीत सारसोळेवासियांची मने जिंकली. जे पालकमंत्र्यांना व महापौरांना जमले नाही, ते संदीप नाईकांनी काही सेंकदात करून दाखविले.

0 1202

दिपक देशमुख
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य ठरविण्यासाठी मतदारराजाकडे आता अवघ्या काही तासाचाच कालावधी शिल्लक राहीला आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिलला सांयकाळी ५ वाजता प्रचाराचा धुराळा कायमचाच थंड होईल आणि खर्‍या अर्थांने निर्णायक थरार सुरू होणार अळीमिळी, गुपचिळी प्रचाराचाच! मंगळवारची रात्र आणि बुधवारचा दिवस आणि रात्र सर्वच पक्षांना जागी राहूनच काढावी लागणार आहे. कारण मतदारांना आमिष दाखविताना विरोधी घटकांकडून गर्व्हनरच्या सहीच्या कागदांचे वाटप झाल, तर आपल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची दाट शक्यता असल्याने कोणीही बेसावध राहण्याचे धाडस दाखविणार नाही.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. शिवसेना आणि एनसीपीसाठी ही लढत राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झालेली आहे. ठाण्याचा गढ गमाविल्याचे शल्य खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच अनेकदा जाहीरपणे बोलून दाखविल्याने ही जागा जिंकून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना, एनसीपी, मनसेच्या महत्वपूर्ण मातब्बर पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना जाळ्यात ओढण्याचे प्रयासदेखील पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान झाले.
ठाण्यातील प्रचाराची सूत्रे सांभाळण्यास खुद्द विचारे परिवार, जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक सक्षम असल्याने शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंनी सर्वाधिक वेळ नवी मुंबईतच घालविला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आंबेडकरी जनतेच्या गळ्यातील ताईत असणारे रामदास आठवले, शेतकरी नेते व ऊस आंदोलनातील लढवय्ये राजू शेट्टी, फेसबुकच्या माध्यमातून व ग्रामीण जनसंपर्कातून बारामतीच्या अभेद्य गडाला खिंडार पाडण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे आमदार शिवतरे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनाधार असणारे व ग्रामीण भागात गाडा संस्कृती जोपासण्यासाठी जिवाचे रान करणारे शिवाजीराव आढळरावपाटील यांच्यासह अनेक रथी-महारथी शिवसेना-भाजपा-आरपीआय व अन्य पक्षांचा समावेश असणार्‍या माहयुतीचे उमेदवार आमदार राजन विचारेंच्या प्रचारादरम्यान सहभागी झाले. आमदार राजन विचारेंदेखील सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत कधीही शिवसेनेसाठी उपलब्ध झाल्याने प्रभागाप्रभागातील शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंनी प्रारंभापासूनच नवी मुंबईची सूत्रे सक्षमपणे सांभाळली. सुरूवातीपासून प्रचाराची रूपरेषा, सभा, बैठका यावर प्रारंभापासून सांभाळली.
नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांचा प्रचारातील सहभाग शिवसेनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. जैन समाज प्रचंड प्रमाणात नाहटाच्या नेतृत्वशैलीकडे आकर्षित होवून शिवसेनेच्या छावणीकडे जावू लागल्याने ही बाब एनसीपीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यातच शिवसेनेच्या नगरसेवकांनी व शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी पालिकेच्या निवडणूकीच्या धर्तीवर आपल्या कार्यक्षेत्रात घरटी प्रचारावर दिलेला भर हा शिवसेनेच्या मतपेटीसाठी उपयुक्तच ठरण्याची शक्यता आहे. यंदा शिवसेनेने चौकसभांवरही भर दिला. चौकसभेत सुकुमार किल्लेदारनामक वादळ एनसीपीच्या अनेक हल्ल्यांना निरूत्तर करत होते. एनसीपीच्या आरोपांची वर्तमानपत्रांतील बातम्यांचेच पुरावे देत चौकसभेत जनतेच्यासमोरच किल्लेदारांनी सातत्याने केलेली चिरफाड बेलापूर मतदारसंघात शिवसेनेसाठी फायदेशीर ठरली. नेरूळ पश्‍चिमेला शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवेंच्या प्रभागात मंजूर होवून वर्क ऑर्डर निघालेला , परंतु राजकीय कारणास्तव जाणिवपूर्वक रखडवलेला हायमस्ट पश्‍चिम महाराष्ट्रातील नेरूळ पश्‍चिममधील जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण करणारा ठरला. रतन मांडवेंना जुईनगर आणि नेरूळ पश्‍चिम परिसरात मानणारा मोठा वर्ग असल्याने मांडवेंच्या प्रभागातील हायमस्ट रखडविण्यात कोणाचा हात आहे, कोणी राजकीय प्रतिष्ठेचा विषय केला, याची माहिती मांडवे समर्थकांनी घरटी पोहोचविल्याने व शिवसेनेच्या चौकसभांमध्ये रखडलेल्या हायमस्टच्या राजकारणाची चिरफाड झाल्याने नेरूळ पश्‍चिममधील जनतेमध्ये संतापाची बाब बनला. मोदी पॅटर्नमुळे गुजराथी, राजस्थानी, पंजाबी आणि हिंदी भाषिकांमध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारेंबाबत विशेष ममत्व निर्माण झाल्याचे प्रचारादरम्यान पहावयास मिळाले. वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेशही राजन विचारेंच्या दिल्ली वाटेसाठी आशिर्वादच लाभल्याचे शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे.
ठाण्यातील आमदाराच्या रूपाने तगडा उमेदवार, ठाणेकर उमेदवार, मोदी लाट, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचे अहोरात्र परिश्रम आणि एकहाती प्रचाराची धुरा नियोजन, वैभव नाईकांचा शिवसेना छावणीतील प्रवेश, माजी महापालिका आयुक्त विजय नाहटांचा सहभाग, चौकसभांमध्ये सुकुमार किल्लेदारांनी चढविलेला तुफानी हल्ला, रतन मांडवेंचा रखडविलेला हायमस्ट, नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्‍यांनी-शिवसैनिकांनी प्रचारात दिलेले योगदान पाहिल्यावर आमदार राजन विचारेंचे खासदार राजन विचारेंमध्ये झालेले परिवर्तन हमखासपणे १६ मेला पहावयास मिळणार असल्याचे शिवसैनिकांकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे.
शिवसेनेकडे नवी मुंबईत स्थानिक पातळीवर रथी-महारथी सक्रिय झालेले असताना एनसीपीचा सर्व खेळ ना. गणेश नाईक या एकखांबी नेतृत्वावरच अवंबून राहीला. आमदार संदीप नाईकांनी ऐरोली सांभाळताना बेलापूर मतदारसंघातही तसेच ठाण्यातही आपल्या संपर्क अभियानाचा करिश्मा दाखविला. संजीव नाईकांनीदेखील ठाण्यात आणि भाईंदरमध्येच अधिक मुक्काम ठोकल्याने प्रचारासाठी ते नवी मुंबईत अधिक काळ उपलब्ध झाले नाहीत. एनसीपीमध्ये अनेकजण बालाजी, व्हाईट हाऊसला चकरा मारत असले तरी त्यांनी आपल्या प्रभागात किती ‘दिवा’ लावला हे नामदार, आमदारांना १६ मेला मतपेटीतच पुराव्यासह दिसून येणार असल्याने ऑक्टोबरसाठीच्या निवडणूकाकरीता नामदार, आमदारांना संघटनात्मक पातळीवर मोठे खांदेपालट करावे लागणार असून दुसर्‍या फळीतील नेतृत्वाला, पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना पुढे घ्यावे लागणार आहे. आमदार राजन विचारेंच्या निवडणूक अर्जातील माहितीचा आधार घेत एनसीपीच्या घटकांनी, फेसबुकवरील चाहत्यांनी शिवसेना उमेदवार गुन्हेगार अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयास एनसीपीवरच शेकविण्याचा शिवसेनेने जोरदार प्रयास केला. अतिक्रमण घोटाळ्यातील आरोपी नगरसेवक, मुख्तार अन्सारी, कुकशेतच्या क्रिकेट पारितोषिक वितरणातील हाणामारी यासह एनसीपीच्या काही नगरसेवकांना पोलिस ठाण्याच्या चढाव्या लागलेल्या पायर्‍या यासह गतविधानसभा निवडणूकीत ना. नाईकांवर खालच्या पातळीवर टीका करणार्‍या रमेश शिंदेचा एनसीपीप्रवेश, एनसीपीचे सेवादल नवी मुंबई अध्यक्ष बुगदे यांना (१२/१२/.२०१२लाच) मारहाण करणार्‍याला एनसीपीत दिलेला प्रवेश या सर्व घडामोडी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यात शिवसेनेचे स्थानिक घटक यशस्वी ठरले.
आमदार राजन विचारेंसाठी उध्दव ठाकरे, रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे नवी मुंबईत सक्रिय झाले असताना एनसीपीच्या संजीव नाईकांसाठी ना. गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, संकल्प नाईक प्रचाराच्या धुराळ्यात सहभागी झाले होते. त्यासोबत जयवंत सुतार, ज्ञानेश्‍वर नाईक, विनायक म्हात्रेदेखील अळीमिळी गुपचिळी बैठका करत नाराजांची समजूत काढत होते. आमदार संदीप नाईकांच्या संपर्क अभियानामुळे भेटीगाठीमुळे शिवसेनेची काही प्रमाणात हवा निघाली.
ना. नाईकांनी गतकाही वर्षात ज्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना ताकद दिली, त्याच घटकांनी एनसीपीला पर्यायाने उमेदवाराचा अडचणीत आणण्याचा नकळत उद्योग केल्याचे १६ मेला मतमोजणीलाच स्पष्ट होणार आहे. ज्यांना महत्वाची पदे दिली, ताकद दिली, त्यांच्याच प्रभागात काय घडणार याची काही प्रमाणात कल्पना आताच येवू लागली आहे. मोदी-नाहटा, वैभव-किल्लेदार या चौकडी फॅक्टरचा काही प्रभागांमध्ये एनसीपीला फटका बसणार आहे. ना. नाईकांचा करिश्मा आणि संदीप नाईकांचा व्यक्तिगत जनसंपर्कच एनसीपीच्या मतदानात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. नगरसेवकांनी कितपत गांभीर्याने काम केले यासाठी बोनकोडेकरांना १६ मेचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. एनसीपीच्या नगरसेवकांनी आपला बडेजाव सांभाळताना शेजारच्या नगरसेवकांना त्रास देत आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा केलेला प्रयासही एनसीपीसाठी तापदायक ठरल्याचे मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे.
संशयकल्लोळ हा एनसीपी आणि शिवसेनेसाठी त्रासदायक ठरणार आहे. शिवसेनेच्या काही मातब्बर घटकांनी आपल्या प्रभागात परिश्रम न करता उमेदवाराच्या सभोवताली फिरूनच फोटोसेशन करण्यात समाधान मानल्याने त्यांच्या प्रभागातील मतदानावर शिवसेनेचे बारीक लक्ष राहणार आहे. एनसीपीच्या काही नगरसेवकांचा गट देखल्या देवा दंडवत या उक्तीप्रमाणे बोनकोडेकरच आल्यावर प्रचारात दिसायचे आणि नंतर मात्र न्यूट्रल राहायचे असे वागत असल्याचे उघडपणे पहावयास मिळाले.
कॉंग्रेसची उदासिनता ही बाब कितपत शिवसेनेला फायदेशीर आणि एनसीपीला त्रासदायक ठरली, याचेही उत्तर १६ मेलाच मिळणार आहे. आम आदमी पार्टीलादेखील प्रचार अभियानाच्या अखेरच्या टप्प्यात नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतीय हिंदी भाषिक आणि मुस्लिम समाजाचा आपच्या प्रचारातील वाढता सहभाग शिवसेनेसह एनसीपीचे निश्‍चितच ठोके वाढविणार आहे.
गतलोकसभा निवडणूकीत १ लाख ३४ हजार मतदान घेवून दबदबा निर्माण करणारी मनसे यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात फारशी गांभीर्याने उतरली नसल्याचे पहावयास मिळाले. मनसे चौथ्या क्रमाकांवर फेकली जाणार असल्याचे खुद्द पडद्याआडून मनसैनिकांकडून व मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून बोलले जात आहे. राज ठाकरेंच्या घणसोलीच्या सभेचाही ऑक्सिजन मनसेच्या प्रचारामध्ये उत्साह निर्माण करू शकला नाही. आंदोलनातील मनसे प्रचारात कोठेही आढळली नाही. मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून व शहर कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांकडून १ ते सव्वा लाखाचा दावा सुरूवातीच्या काळात करण्यात आला असला तरी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात पानसेंना तितकेही मतदान होईल की नाही याबाबत खुद्द मनसैनिकच सांशक आहेत.
एनसीपी आणि शिवसेनेसाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मोदी लाट, नाहटा-वैभव-किल्लेदार-ठाणेकर उमेदवार, आपची मुसंडी जोरदार, मनसेचा थंडावा ही सर्व परिस्थिती एनसीपीकरीता प्रतिकूल असली तरी ना. नाईक यातूनही करिश्मा दाखवतील असा भोळाभाबडा अंदाज आजही सच्च्या नाईक समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतदान आता अवघ्या काही तासावर आले असल्याने अळीमिळी- गुपचिळीच्या प्रचारातील घडामोडीही मतदानावर प्रभाव पाडण्याची शक्यता असल्याने सर्वानीच तुर्तास जागते रहो!

नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेला बदलत्या राजकीय समीकरणामुळे कागदोपत्री पालिका प्रभागातील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘प्रबळ’ वाटत असली तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. कुकशेत या सुरज पाटलांचा प्रभाग वगळता स्नेहा पालकर, नारायण पाटील, रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, इंदूमती भगत, सतीश रामाणे यांच्या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी फारसे प्रभावी चित्र नाही. त्यामुळे नेरूळ पश्‍चिमेला संदीप नाईकांचा मित्र परिवार, काही प्रमाणात व्यक्तिगत असलेला जनसंपर्क, नेरूळ पश्‍चिमेला संदीप नाईकांनी केलेले मदतकार्य पाहता नेरूळ पश्‍चिमेची धुरा संदीप नाईकांनी स्वत:कडे घ्यावी असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नेरूळ पश्‍चिमेला सुरूवात करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्नेहा पालकरांच्या प्रभागापासून होते. त्यालगतच असलेल्या प्रभागात कॉंग्रेसचे नगरसेवक रंगनाथ औटी यांचा प्रभाग आहे. एकेकाळी रंगनाथ औैटी हे राष्ट्रवादी कॉंगेे्रेसचे वॉर्ड अध्यक्ष होते. पालिकेच्या चौथ्या निवडणूकीत तिकीट कापले गेल्यावर कॉंग्रेस पक्षात नामदेव भगतांच्या माध्यमातून प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढविली. शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख राजेश पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक दिग्गज नेते जयवंत सुतार आदी रथीमहारथींचा पराभव करून रंगनाथ औटी पालिका सभागृहात दाखल झाले. रंगनाथ औटींवर असलेला नामदेव भगतांचा प्रभाव पाहता आणि स्थानिक पातळीवर जयवंत सुतारांशी रंगनाथ औटींशी असलेले राजकीय ‘हाडवैर’ पाहता औटी राष्ट्रवादीशी पर्यायाने जयवंत सुतारांशी जुळवून घेण्याची शक्यता कमीच आहे
नेरूळ सेक्टर २ आणि ४ चे प्रतिनिधीत्व करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्नेहा पालकर या तीन वेळा पालिकेत निवडून गेल्या असल्या तरी या प्रभागात शिवसेनेची व कॉंग्रेसची ताकदही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तोडीस तोड आहे. शिवसेनेत या भागात अकरा गट कार्यरत असले तरी त्यांचे मतभेद पालिका निवडणूकीतच उफाळून येतात. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत हे गट आपली गटबाजी संपवून एकजीवपणे काम करत असल्याचा इतिहास आहे. कॉंग्रेसचे रविंद्र सावंत यांचे कार्य पाहता व त्यांच्या पाठीशी असलेला जनाधार पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला परवडणारे नाही. रविंद्र सावंतांची नगरसेवक बनण्याची महत्वाकांक्षा पाहता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करून आपल्या पायावर धोंडा मारून घेणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर २-४चे गणित पाहता शिवसेनेला रोखण्यासाठी त्यांना रविंद्र सावंतांची मनधरणी करावी लागण्याची शक्यता आहे.
नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावातील नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असला तरी या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. या भागातील कॉंग्रेसी घटकांवर पूर्णपणे नामदेव भगतांचा प्रभाव असून हजारोंच्या संख्येने लेखी तक्रारी करून, निवेदने देवून प्रभागातील नागरी समस्या सुटत नसल्याच्या व नागरी सुविधा रहीवाशांना मिळत नसल्याचा संताप कॉंग्रेसी घटकांकडून व्यक्त केला जात आहे. गणपत शेलार आणि विरेंद्र लगाडे या जोडगोळीने शिवसेनेची भक्कम बांधणीसाठी गेल्या काही वर्षापासून प्रयास सुरू केल्याने शिवसेनेची येथील स्थिती सुधारली आहे. गणपत शेलारांनी अपक्ष निवडणूक लढवून येथील आपल्या पाठीशी असणारा जनाधार वेळोवेळी स्पष्ट केलेला आहे. या भागातील हॅट्ट्रीकवीर नगरसेवक नारायण पाटील हे वारंवार आजारी पडत गेल्याने या प्रभागात विरोधक विशेषत: कॉंग्रेस प्रबळ होत गेली. प्रल्हाद पाटील आणि समुद्रा पाटील या उभयंताना नारायण पाटलांसारखी किमया साध्य करणे अद्यापि शक्य झाले नाही. बामणदेवाच्या भंडार्‍याला येण्यास बोनकोडेकरांना येण्यास सवड मिळत नसल्याचा संताप सारसोळेच्या कोळीवाड्यातून उघडपणे व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसच्या मनोज मेहेरांचा सामाजिक कार्यातून सारसोळे गावामध्ये व नेरूळ सेक्टर सहामध्ये नावलौकीक वाढीस लागला आहे. मनोज मेहेर यांनी महापौर व उपमहापौर तसेच पालकमंत्र्यांनाही निवेदने देवूनही प्रभागातील कामे न झाल्याचा संताप मनोज मेहेरांच्या निकटवर्तीयांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे. नेरूळ सेक्टर सहामधील दत्तगुरू इमारतीचा धोकादायकपणा, नेरूळ सीव्ह्यू सोसायटीची उद्यानालगतची तुटलेली संरक्षक भिंत, मार्च महिन्यात भाजी मार्केट मैदानात सार्वजनिक कार्यक्रमांस केलेला विरोध यासह अन्य कामांमुळे मनोज मेहेर हे सिडको वसाहती आणि खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. पालिका प्रशासन पातळीवर प्रभागातील कामांच्या बाबतीत झालेली उपेक्षा पाहता या प्रभागातील कॉंग्रेस तटस्थ राहण्याची अथवा शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. गतलोकसभा निवडणूकीत या प्रभागातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. सारसोळे गावात आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावामधील कोळी वाडा तसेच अन्य ग्रामस्थांमध्ये बाजूच्या प्रभागातील शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवेंना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. आरपीआयचे युवा नेते मनोज तांडेल यांच्याही कार्याचा व जनसंपर्काचा शिवसेनेला फायदाच होणार आहे.
नेरूळ सेक्टर ८ परिसरात शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांना मानणारा वर्ग मोठा असून त्यांच्या पाठीशी जनाधारही आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने मांडवेंना अडचणीत आणण्याचे व त्यांचे कार्यकर्ते फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला गेल्याचे विभागातील जनतेने जवळून पाहिले आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक असतानाही प्रशासनाशी ‘मधुर’ संबंध ठेवून प्रभागातील कामे करून घेण्याची ‘हातोटी’ मांडवेंना साध्य झाल्याने सभोवतालच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांपेक्षाही मांडवेंनी अधिक कामे केल्याचे त्यांच्या प्रभागातील जनतेला माहिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांनी मांडवेंना कोंडीत पकडण्याचा व त्यांचे जवळचे कार्यकर्ते फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राबविण्यात चार वर्षे घालविली, त्यापेक्षा जनतेची कामे केली असती तर आज राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चित्र वेगळे असते, असे जनतेकडूनच सांगितले जात आहे. मांडवेंच्या कार्यकर्त्यांची ‘सीसी’ राष्ट्रवादीने पळविण्याचे उद्योग सातत्याने केले असले तरी प्रभागातील जनाधाराची ‘ओसी’ मात्र मांडवेंकडेच असल्याने या प्रभागात शिवसेनेला पिछाडीवर टाकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य होणार नाही. रतन मांडवेंना दाबण्याचा सातत्याने प्रयास करताना नकळत रतन मांडवेंना मोठा करण्याचा प्रयासच राष्ट्रवादीकडून झाला असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे.
नेरूळ सेक्टर १० परिसर हा एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पालिका निवडणूकीत या प्रभागातून कट्टर शिवसैनिक असणारे दिलीप घोडेकर ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. घोडेकरांचे कार्य व जनसंपर्कामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झाला असून शिवसेनेखालोखाल या ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे. रमेश शिंदेंनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या ठिकाणच्या राष्ट्रवादीत नाराजीचे धुमारे धुमसू लागले आहेत. कॉंग्रेसचे नामदेव भगतांनी पराभूत झाल्यावरही येथील जनसंपर्क तोडला नाही. उलटपक्षी सातत्याने विविध उपक्रम राबविताना येथील लोकांशी व्यक्तिगत ‘टच’ कायम ठेवला. पालिका निवडणूकीत शिवसेना उमेदवाराला विजयी करण्यासाठी नामदेव भगतांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणा मातब्बरांनी काम केले याची भगतांना इत्यंभूत माहिती असल्याने ते लोकसभा निवडणूकीत या उपकराची परतफेड करण्याची शक्यता अधिक आहे. राजेश भोरसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा जनसंपर्कच राष्ट्रवादीच्या मतदानाला टेकू लावण्याची शक्यता आहे.
कुकशेत गाव आणि तेरणा शाळेसमोरील सिडकोच्या मोजक्या सोसायट्यांचा अपवाद वगळता बनलेल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व सुरज पाटील करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या प्रभागातील दबदबा केवळ सुरज पाटील या एकखांबी तंबूवरच अवलंबून आहे. राजकारणात ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ या नावानेच सुरज पाटील यांना ओळखले जाते. सातत्याने विकासकामे करून व जनतेची नस ओळखून परिश्रम करणार्‍या सुरज पाटीलांचा हा गड नेरूळ पश्‍चिममध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी मिळवून देणारा हमखास एकमेव मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचाही प्रभाव असून येथे नामदेव भगत हेही काही प्रमाणात चलनी नाणे आहे. या प्रभागात शिवसेनेला मिळणारी मते बबनदादा पाटील या माणसाचा जनाधार स्पष्ट करणारी असल्याने ही लोकसभा निवडणूक बबनदादा पाटील यांच्याकरीताही महत्वाची आहे. बबनदादांना स्वत:च्या वॉर्डात कोण विचारत नाही अशी नाराजी सभोवतालच्या प्रभागातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत असल्याने कुकशेतमधून शिवसेनेला तारण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे.
नेरुळ सेक्टर १६,१८,२४ हा प्रभाग काही काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात आहे. सतीश रामाणेसारखा मुरब्बी अवलिया चाणाक्ष या प्रभागाचे पालिकेत प्रतिनिधीत्व करत आहे. रामाणेंनी केलेली विकासकामे आणि शिवसेनेला मानणारा वर्ग ही शिवसेनेसाठी येथे जमेची बाजू आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांचा हा निवासी परिसर असून पालिकेच्या तिसर्‍या सभागृहात ते येथील नगरसेवक होते. काशिनाथ पवार पुन्हा शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. सुनिल हुंडारेसारखा विभागप्रमुख शिवसैनिकांमध्ये व स्थानिक परिसरात लोकप्रिय असल्याने हा प्रभाग शिवसेनेसाठी मताधिक्यांचा प्रभाग ठरणार आहे. गणेश भगत आणि डी.डी.कोलतेंसह काही घटक राष्ट्रवादीसाठी काम करत असले तरी या प्रभागावर शिवसेनेचा असलेला प्रभाव पुसुन काढणे कोणालाही शक्य झाले नाही. कॉंग्रेसचे वर्गिस डॅनियल येथे कार्यरत असलेे तरी नामदेव भगतांकडून ज्या सूचना येतील त्याच सूचनांचे वर्गिस व त्यांचे सहकारी पालन करण्याची दाट शक्यता आहे.
नेरूळ गावातून सलग तीन टर्म कॉंग्रेसच्या नगरसेविका इंदूमती भगत या विजयी झालेल्या आहेत. सासर आणि माहेर हे दोन्ही इंदूमती भगतांसाठी नेरूळ गावच आहे. इंदूमती भगतांची कामे, जनसंपर्क, स्वच्छ प्रतिमा, आध्यात्माची आवड आणि नामदेव भगत यांचा करिश्मा नेरूळ गावाचा जनाधार स्पष्ट करत आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे यांचा निवासी परिसर याच प्रभागात असला तरी त्यांचा फारसा दबदबा मतपेटीच्या माध्यमातून दिसून येत नाही. इंदूमती भगतांच्या प्रभागातील बांचोली मैदानाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांनी केेलेले राजकारण कॉंग्रेसी कार्यकर्त्यांसाठी संतापाची बाब असल्याने भगत आणि त्यांची कॉंग्रेस नेरूळ गावात मनापासून राष्ट्रवादीला सहकार्य करण्याची शक्यता कमीच आहे.
नेरूळ पश्‍चिमेला स्नेहा पालकर, नारायण पाटील, रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, सुरज पाटील, सतीश रामाणे, इंदूमती भगत अशा सात नगरसेवकांच्या प्रभागात सुरज पाटीलांचा प्रभाग सोडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी फारसे सुचिन्ह दिसून येत नाही.उपमहापौर अशोक गावडे यांच्या प्रभागाचा काही भाग नेरूळ पश्‍चिमेला मोडत असला तरी अधिकांश भाग सिवूडस परिक्षेत्रात येतो. महापौर सागर नाईकांनी नेरूळला गतकाही महिन्यात नेरूळला वरचेवर भेटी देवूनही फारसा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला झालेला नाही. उलटपक्षी महापौर केवळ रतन मांडवेंच्या प्रभागालाच भेट देण्यास येत असल्याचे आता उपहासाने बोलले जावू लागले आहे.
मराठी भाषिकांचा नेरूळ पश्‍चिमेला वावर जास्त आहे. संदीप नाईकांचा पामबीच मार्गावरील वाधवा टॉवरमधील भेटीगाठी विरोधकांना धडकी भरविणार्‍या आहेत. नेरूळ सेक्टर ४,६,१६,१०,१८, २४ या ठिकाणी मोठ्या संख्येने मित्र परिवार विखुरलेला असून या भागातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक भागातील अधिकांश भागातील घटकांचा संदीप नाईकांशी व्यक्तिगत ‘टच’ आहे. सारसोळे गावातील ग्रामस्थांची ना. गणेश नाईकांवर मोठी नाराजी असली तरी संदीप नाईकांशी त्यांचे बिगर राजकीय संबंध घनिष्ठ आहे. या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ संदीप नाईकांचा करिश्माच तारण्याची शक्यता असल्याने त्यांना लवकरात लवकर सक्रिय करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

अमोल शीरसागर
नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचा व्यक्तिगत पातळीवर बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. सर्वपक्षीय घटकांशी, नगरसेवकांशी, पदाधिकार्‍यांशी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा व्यक्तिगत ‘टच’ असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ओबामांचा जनसंपर्क राष्ट्रवादी कॉंग्रेसला तारणार का हीच चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यामध्ये चर्चेतल्या मतदारसंघापैकी एक आहे. एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा हा मतदारसंघ शिवसेनेच्याच काही चुकांमुळे आणि मतविभागणीमुळे राष्ट्रवादीमय झाला. तथापि या मतदारसंघातील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने आणि खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याविषयीचे ‘शल्य’ जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यांनी हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी स्वच्छ प्रतिमेची ठाण्यातील आमदार राजन विचारेंना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यातच मनसेचा गतवेळेप्रमाणे फारसा जोर नसल्याने एक लाख ३४ हजार मतांना कुर्निसात करणारी मनसे एक लाखाच्या आतच अडखळणार असल्याने हाही अडथळा राष्ट्रवादीसाठी नुकसानदायी व शिवसेनेसाठी फलदायी ठरणार आहे. आम आदमी पक्षाने निर्माण केलेले आव्हान, परप्रातिंयामध्ये आपची लोकप्रियता, सुशिक्षितांमध्ये आपचे आकर्षण या बाबीदेखील राष्ट्रवादीसाठी चिंता वाढवित असून शिवसेनेकडून सर्वच बाजूंनी अनुकूल वातावरण पहिल्याच टप्प्यात निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षबांधणी कमकुवत असल्याने, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्‍यांचा फारसा प्रभाव नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकवार नाईक परिवाराच्या वैयक्तिक करिश्म्यावर लढवावी लागणार आहे. शिवसेनेने प्रचारासाठी जय्यत तयारी सुरू केली असून शाखांशाखांमध्ये रणनीती आखली जात आहे. खुद्द शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंनीही नवी मुंबईच्या अनेक भागांना भेटी देण्याचा धडाका लावल्याने ही निवडणूक शिवसेना एका वेगळ्याच जिद्दीने लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसैनिकांतही नव्याने उत्साह संचारला आहे.
एकेकाळी नवी मुंबई हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने गणेश नाईकांचा बालेकिल्ला राजकीय क्षेत्रात गणला जायचा. पण आता तशी परिस्थिती राहीलेली नाही. शिवसेना नव्या जोमाने पुढे येवू लागली आहे. गजानन काळे, संदीप गलुगडे, मंदार मोरे, निलेश बाणखिले, विनोद पार्टे, धीरज भोईर, गजानन खबाले, शिरीष पाटील, अमर पाटील, सविनय म्हात्रे, यांच्यासारख्यांमुळे मनसे नावारूपाला येवू लागली आहे. बाबाजी गोडसे, जयेश मढवी, विठ्ठल गावडे, नितीन नाईक यासारख्या अनेक शाखाध्यक्षांमुळे मनसेची पायामुळे प्रभागाप्रभागात विस्तारू लागली आहेत. जनहितची धुरा मनसेने हाजी शाहनवाझसारख्या मुरब्बी धुरीणाकडे सोपविल्याने मुस्लिमांना मनसे पर्याय उपलब्ध झाला आहे. जुन्या कार्यकारिणीच्या थंडपणामुळे निस्तेज झालेली मनसे आता आक्रमकतेमुळे जनसामान्यांमध्ये चर्चिली जावू लागली आहे. ना. गणेश नाईकांच्याही भाषणात नाविन्य राहीले नसल्याचा सूर राष्ट्रवादीच्याच घटकांकडून आळविला जावू लागला आहे. संजीव नाईकांना ठाणे-भाईंदरवर लक्ष केंद्रीत करावयाचे असल्याने आमदार संदीप नाईकांनाच नवी मुंबईत प्रचारयंत्रणा सांभाळावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आमदार संदीप नाईकांचा ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. वारंवार काढलेल्या पाहणी अभियानांमुळे जनसामान्यांची नस त्यांना समजलेली आहे. पालिकेच्या तिसर्‍या सभागृहात वावरताना सलग तीन स्थायी समिती सभापतीपद सांभाळताना त्यांनी ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान चालविले होते. पावसाळीपूर्व कामांची पाहणी करताना त्यांनी नवी मुंबईकरांची मानसिकता, राहणीमान, समस्या याचाही अभ्यास केला होता. बोनकोडेत ना. गणेश नाईक, संजीव नाईकांच्या तुलनेत संदीप नाईकांची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी आहे. संदीप नाईक ऐरोलीचे आमदार असले तरी बेलापूरातील खडा न् खडा माहिती त्यांना तात्काळ उपलब्ध व्हायची. पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत इतर पक्षामध्ये काय चालले आहे याचाही अपडेट संदीप नाईकांकडे तात्काळ जमा होत असतो.
संदीप नाईकांचा नवी मुंबईत विखुरलेला मित्रपरिवार पाहता आणि सिडको सदनिकाधारकांमध्ये त्यांची प्रतिमा पाहता संदीप नाईकांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. कंडोनिअमअंतर्गत झालेली सिडको वसाहतीमधील कामे ही संदीप नाईकांच्या परिश्रमाची पोचपावती असल्याची अशी कृतज्ञता आजही सिडको वसाहतीमधून व्यक्त करण्यात येत आहे. ऐरोली मतदारसंघात सर्व काही आलबेल नसल्याने व घरातच भाऊबंदकीचे आव्हान मिळाल्याने संदीप नाईकांना ऐरोलीचा गड सांभाळताना बेलापूरातही डागडूजी करण्याची करामत करावी लागणार आहे.

योगेश शेटे
नवी मुंबई : दिघा ते बेलापूरदरम्यानच्या नवी मुंबई पट्टीत सारसोळे गाव गेल्या काही वर्षापासून चांगलेच नावारूपाला आलेल्या सारसोळे गावाची प्रत्येक गोष्टीची आज दखल घेण्यात येवू लागली आहे. होळीच्या दिवशी मध्यरात्री पेटविण्यात येणारी होळी मैदानावरची सारसोळे ग्रामस्थांची होळी हीदेखील नवी मुंबईकरांमध्ये आकर्षणाचा विषय ठरू लागली आहे.
सारसोळेच्या कोळी वाड्यातील होळी मैदान. रविवार सकाळपासूनच होळी मैदानावर ग्रामस्थांची लगबग सुरू आहे. नवी मुंबईतल्या कार्यक्षेत्रातल्या ठिकठिकाणच्या होळ्या लक्षवेधी असल्या तरी सारसोळेकरांच्या होळीची सर कोणाला येणे शक्यच नाही. होळी मैदानात गेल्या काही वर्षापासून नाही तर पिढ्या न् पिढ्या सारसोळेकर ग्रामस्थ होळीचे आयोजन करत आहेत. मध्यरात्री १२ वाजता सारसोळेकर ग्रामस्थ होळी पेटवित असतात.
सारसोळेकरांची होळी सजविण्याची पध्दतीदेखील अनोखी असल्याने ही होळी नवी मुंबईत नेहमीच चर्चेचा विषय बनते. २५० ते ३०० किलो फुले आणून सारसोळेचे ग्रामस्थ होळीची सजावट करत असतात. या होळीला केवळ सारसोळेचे ग्रामस्थच नाही तर सभोवतालच्या परिसरातील रहीवाशीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सारसोळेकरांच्या होळी मैदानावरील होळीला एक भावनिकतेची झालर असते. होळी साजरी करताना सारसोळेकरांचे परिश्रम पाहिल्यावर होळीवरील प्रेमाची प्रचिती येते. सारसोळेकर ग्रामस्थ सध्या जनता दरबार, पालिका मुख्यालय , नेरूळ विभाग कार्यालय आणि मंत्रालयातही चर्चेचा विषय बनू लागले आहेत. बेलापूर, बोनकोडे, चिंचपाडा इतके मातब्बर राजकारणी सारसोळेच्या कोळीवाड्यात राहत नसले तरी प्रशासन दरबारी समस्यांचा पाठपुरावा करताना गेल्या ६/७ वर्षामध्ये सारसोळेच्या युवा, होतकरू ग्रामस्थांनी आजमितीला आपल्या गावाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले आहे.

अमोल शीरसागर
नवी मुंबई :- महापालिका प्रभाग ७० मंजूर झालेल्या हायमस्टचे राजकारण करत शेजारच्या प्रभागातील एका नगरसेवकाने राजकारण करत आजवर रखडवल्याने नेरूळ पश्‍चिमेला त्या नगरसेवकाबाबत आणि त्याच्या पक्षाबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘ऑफ द् रेकॉर्ड’ चर्चा करताना मनसे, आप आणि कॉंगे्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर कबुली दिल्याने हायमस्ट रखडवण्याचे राजकारण करणार्‍यांच्या विरोधात आता घरटी प्रचार सुरू झाल्याने हायमस्टचे राजकारण नेरूळ पश्‍चिमेला कलाटणी देण्याचा विषय बनला आहे.
‘मेरी कमिजसे उसकी कमिज सफेद क्यू है’ अशी एका साबणाची व डिटर्जन्ट पावडरची जाहीरात टीव्ही वर करण्यात येत होती. पण नेरूळच्या राजकारणात माझ्या प्रभागात कामे होत नाही, माझ्या फाईलींना मंजुरी मिळत नाही आणि शेजारच्या प्रभागातील विरोधी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात कामे कशी होतात, त्या नगरसेवकाच्याच फाईली मंजुर कशा होतात याबाबत इर्षेचे व सूडाचे राजकारण खेळत गेल्या काही दिवसापासून प्रभाग ७० मध्ये मंजूर झालेल्या व वर्क ऑर्डर मंजूर झालेल्या हायमस्टला पालिका अधिकार्‍यांवर दबाव टाकत रखडवण्यात शेजारच्या प्रभागातील नगरसेवकाला यश आले असले तरी त्या नगरसेवकाच्या पक्षाला हायमस्टचे राजकारण करण्याची करामत लोकसभा निवडणूकीत महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिका प्रभाग ७० मधील शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तसेच अधिकार्‍यांकडे चपला झिजवून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. शिवसेना नगरसेवक मांडवे यांच्या प्रभागातील होत असलेल्या विकासकामांबाबत त्या लगतच्या प्रभागातील एका नगरसेवकाला नेहमीच पोटदुखीचा विषय ठरला आहे. मांडवेंशी कामाच्या बाबतीत स्पर्धा होत नसल्याने तसेच मांडवेंच्या पाठीमागे असलेला जनसंपर्क तोडणे शक्य न झाल्याने संबंधित नगरसेवकाने पालिका प्रशासनातील विद्युत विभागातील अधिकार्‍यांवर दबाव टाकत मांडवेंच्या प्रभागात मंजूर झालेला ‘हायमस्ट’ रखडवण्याचे राजकारण केले.
शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या प्रभागात काही ठिकाणी हायमस्ट मंजूर करून वर्क ऑर्डरही काढण्यात यश मिळविले आहे. तथापि नेरूळ सेक्टर आठमधील गेहलोत बिल्डींगसमोरील रस्त्याच्या विरूध्द दिशेला संजीवनी हॉस्पिटलच्या समोरच एक हायमस्ट नगरसेवक मांडवेंच्या प्रयासातून बसविला जाणार होता. मांडवेंच्या हायमस्टला मंजूरी मिळूनही त्या हायमस्टची वर्क ऑर्डरही काढण्यात आली होती. तथापि आपण पाठविलेल्या ‘हायमस्ट’च्या फाईलला परवानगी मिळत नाही आणि मांडवेंच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी हायमस्ट बसविला जाणार असल्याचे समजताच शेजारील नगरसेवकाने हायमस्टचे राजकारण वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय करत हायमस्ट आजतागायत रखडवला आहे. पालिका प्रशासनातील विद्युतचे अधिकारीदेखील त्या नगरसेवकाच्या दबावतंत्राला बळी पडल्याने अद्यापि हायमस्ट बसविण्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
हायमस्टचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे आणि कोणत्या नगरसेवकाने हे उद्योग सुरू केले आहेत, याबाबतची तपशीलवार माहिती पालिका प्रशासनातीलच अधिकार्‍यांनी ‘ऑफ द् रेकॉर्ड’ चर्चा करताना मनसे,आम आदमी पार्टी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्याने नेरूळमधील राजकारणान कलाटणी घेतली असून आता घरटी हायमस्टच्या प्रचारास सुरूवात केली आहे. शिवसेना नगरसेवक रतन मांडवे यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने हायमस्ट प्रकरणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शेजारच्या नगरसेवकाने खालच्या पातळीवर केलेले राजकारण आता सर्वपक्षीय राजकारण्यांमध्ये संतापाचा विषय बनला आहे. नेरूळ सेक्टर ८,१०,६,२, १६,१८,२४ या परिसरात जुईनगरमध्ये रतन मांडवेंना मानणारा पश्‍चिम महाराष्ट्राचा मोठा जनसमुदाय असल्याने तसेच सारसोळे गाव आणि नेरूळ गावच्या ग्रामस्थांमध्ये मांडवेंची चांगलीच उठबस असल्याने हायमस्टच्या बाबतीत झालेले राजकारण आणि प्रशासनावर दबाव आणून रतन मांडवेंची केली जाणारी गळचेपी पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी व स्थानिक ग्रामस्थांसाठीही संतापाची बाब बनली आहे.
हायमस्टचे राजकारण करत शेजारच्या प्रभागातील नगरसेवकाने ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावरच केले आहे. पालिका प्रशासनाच्या अधिकार्‍यांनीदेखील इतर पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना मांडवेंचीच बाजू घेत आक्षेप घेणार्‍या नगरसेवकांनी काय उद्योग केले आणि आपणास कशामुळे गप्प बसावे लागत आहे याची ‘टिप’च दिल्याने आता नेरूळमधील इतर पक्षाचे कार्यकर्ते पक्ष म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून मांडवेंना सोबत करण्याची भाषा बोलू लागले आहेत. गुरूवारी व शुक्रवारी दोन दिवसात मनसे, आप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हायमस्टचे राजकारण घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. हायमस्टचा उजेड किती पडेल तो पडेल, पण हायमस्टच्या बाबतीत पालिका प्रशासनावर दबाव आणून राजकारण करणार्‍या नगरसेवकाच्या पक्षाला मात्र या हायमस्टमुळे नेरूळमधील पश्‍चिम महाराष्ट्रातील घटकांची नाराजी सहन करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मकरंद वैती

नवी मुंबई : ठाण्याच्या लोकसभेकडे राज्यातील रथी-महारथींचे लक्ष लागून राहीले आहे. अद्यापि राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार जाहीर केलेला नसल्याने लढतीचा रंग चढणार की बेसूर होणार याचा उलगडा अजून झालेला नाही. ठाण्याची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पर्यायाने ना. गणेश नाईकांसाठी आणि शिवसेनेसाठी पर्यायाने आ. एकनाथ शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. राजन विचारेंकरीता प्रतिष्ठेची असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत दुव्याचा आणि प्रबळ बाबींचा शोध आणि बोध घेण्याचे पडद्याआडून प्रयास सुरू झाले आहेत. नवी मुंबईत महीला बचत गटांवर निवडणूक काळात पैशाची होणारी उधळण आणि त्यामाध्यमातून एकगठ्ठा मते लाटण्याचे प्रकार मागील लोकसभा, विधानसभा आणि नवी मुंबई महापालिका निवडणूकीत वाढीस लागलेे आहेत.
शिवसेना, मनसे आणि आपच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांचे ‘व्हिटॉमिन एम’चे पारडे जड असल्याने महिला बचत गटांच्या माध्यमातून पैशाचे होणारे वाटप उघडकीस आणून निवडणूक आयोग आणि पोलीसांच्या माध्यमातून परस्परांना जेरीस आणण्याची रणनीतीदेखील जोर धरू लागली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात निवडणूकांमध्ये मिळणार्‍या पैशाकडे टक लावून बसणार्‍या महिला बचत गटांच्या सदस्यांना व पदाधिकार्‍यांनाही वेळ पडल्यास पोलीस ठाण्याच्या चपला झिजवाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला बचत गटांना पोलीस ठाण्याच्या वार्‍या कराव्या लागल्या ना, मगच त्यांची पैसे घेवून मते विकण्याची हौस भागेल असे राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून , कार्यकर्त्यांकडून उघडपणे सांगितले जात आहे. पाच वर्षे आम्ही मर मर मरायचे, प्रामाणिकपणे काम करायचे आणि निवडणूका आल्यावर काम न करणार्‍यांनी महिला बचत गटांना अर्ज वाटून पैसे उधळून मॅनेज करायचे, हे असले धंदे यापुढे नवी मुंबईत चालू न देण्याचा संताप आता मनसैनिकांकडून आणि शिवसैनिकांकडून व्यक्त केला आहे. त्यातच नवी मुंबईच्या राजकारणात नव्याने सहभागी झालेल्या आपच्या सदस्यांकडेही प्रस्थापितांसह अन्य राजकीय घटकांना कानडोळा करणे महागात पडण्याची शक्यता आहे. आपच्या सदस्यांचे ग्रासरूटवर संपर्क असल्याने त्यांच्याकडूनच महिला बचत गटांच्या आमिषाची ‘भांडाफोड’ होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.
एका राष्ट्रीय पक्षाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रात गेल्या पाच-सहा दिवसापासून महिला बचत गटाच्या सदस्यांना अर्ज वितरीत केले जात असून त्यांच्याकडून फोटो, रेशनिंग कार्डची झेरॉक्स, वीज बिलाची झेरॉक्स आणि आधार कॉर्डची झेरॉक्स जमा करण्याचे काम त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून सुरू झाले आहे. बचत गटाच्या महिला सदस्यांना व पदाधिकार्‍यांना ठराविक एका पक्षाच्या राजकारण्यांकडून वितरीत करण्यात आलेल्या अर्जामध्ये स्थानिक नगरसेवकाचे अथवा वॉर्ड अध्यक्षाचेमहिला सदस्याची माहिती, घरातील सदस्यांची माहिती, गावचा व येथील स्थानिक पत्ता, घरातील सदस्यांची नावे, फोन क्रमांक, तसेच नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरमधील नातेवाईकांची नावे, त्यांचा भ्रमणध्वनी आदी विस्तृतपणे तपशीलवार माहिती संकलनाचे काम तीव्र गतीने सुरू आहे. गेल्या निवडणूकीचे अनुदान अजून मिळाले नसल्याने आताही अर्ज भरून केवळ मते लाटण्याचेच काम करणार का, असा संतप्त सूर ठिकठिकाणच्या महिला बचत गटांच्या सदस्यांकडून आळविला जावू लागला आहे. मनसेचा उमेदवार अजून जाहीर केला नसला तरी बेलापूर विधानसभा जिंकण्याचे मनसेच्या घटकांची महत्वाकांक्षा पाहता वितरीत झालेल्या अर्जावर आणि बचत गटांवर त्यांचीही शिवसेनेप्रमाणेच करडी नजर आहे. महिला बचत गटांना वितरीत झालेल्या या अर्जाबाबत निवडणूक आयोगाला कळविले का, निवडणूक खर्चात समावेश करणार का, आदीबाबतची विचारणा थेट प्रचारसभांमधूनच करण्याचा अन्य राजकीय धुरींणाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला बचत गटांना मागील निवडणूकांप्रमाणे यंदाही पैसे मिळण्याची दाट शक्यता असली तरी हा अळीमिळी गुपचिळीचा प्रकार बचत गटांच्या सदस्यांना आणि पदाधिकार्‍यांना पोलीस ठाण्याच्या पायर्‍याही चढण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे महिला बचत गटांच्या सदस्यांनी व पदाधिकार्‍यांनी सर्वप्रथम आपल्या पतीराजांचा सल्ला घ्यावा, कारण कोणत्याही पतीला आपली पत्नी बचत गटाच्या पैशामुळे पोलीस ठाण्यात गेली हे आवडणार नाही असे मनसेच्या काही घटकांकडून आवाहन केले जात आहे. त्यामुळे प्रचार रंगण्याआधी, उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच शिवसेना, मनसे आणि आपचे घटक कमालीचे सतर्कता दाखवित असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील घडामोडी ग्रासरूटपर्यत वादळी व वादग्रस्त ठरण्याची शक्यता आतापासूनच निर्माण झालेली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ऑक्टोबर २०१४मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीमच असल्याने शिवसेना-मनसे आणि आपचे घटक गल्ली-बोळात, कानाकोपर्‍यातील घडामोडी टिपू लागल्याने यंदा सर्व काही आलबेल नसल्याची जाणिव कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीलादेखील झाली असणार.

नवी मुंबई : भारतीय प्रेस कौन्सिलच्या व्याख्येनुसार पेड न्यूज म्हणजे पैसे देऊन अथवा वस्तूच्या बदल्यात कोणत्याही माध्यमामध्ये (प्रिंट/इलेक्ट्रॉनिक) एखादी बातमी अथवा परीक्षण छापून आणणे. आयोगाने सर्वसाधारणपणे ही व्याख्या स्वीकारली आहे.

* जाहिरात आणि बातमी यात फरक काय ?
प्रेस कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बातमी आणि जाहिरात यातील सीमारेषा डिस्क्लेमर छापून स्पष्ट केलेली असते. जाहिरात ही विक्री वाढवण्यासाठी असते तर बातमी माहितीसाठी असते.

* निवडणूक आयोगाला पेड न्यूजवर नियंत्रण का आणावे लागले ?
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगाने पेड न्यूज समस्या अनुभवली. राजकीय पक्ष आणि माध्यमांनी पेड न्यूज विरोधात कडक पावले उचलण्याची विनंती आयोगाकडे केली. संसदेतही यावर चर्चा झाली. ४ ऑक्टोबर २०१० रोजी आणि ९ मार्च २०११ रोजी आयोगाबरोबर झालेल्या बैठकांमध्ये पेड न्यूज विरुध्द कठोर उपाय योजना आखण्याबाबत सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत झाले.

* पेड न्यूजचे दुष्परिणाम काय आहेत ?
निवडणूक काळात, पेड न्यूज जनतेमध्ये गैरसमज निर्माण करते, मतदारांना प्रभावित करते आणि त्यांच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होतो.

* पेड न्यूजवर नियंत्रण कसे ठेवायचे ?
माध्यमे आणि राजकीय कार्यकर्त्यांद्वारे स्वनियंत्रण सध्याच्या यंत्रणेचा कठोर वापर जनतेला आणि हितधारकांना जागरुक करणे

* पेड न्यूजला गुन्हा ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पावले उचलली ?
आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सुचवला आहे, ज्यात एखादया उमेदवाराच्या निवडणुकीत संधी वाढवण्याबाबत किंवा एखादया उमेदवाराबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी पेड न्यूज प्रकाशित केली असेल, तर कायदयानुसार तो गुन्हा ठरेल आणि किमान दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल.

*पेड न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाने कोणती यंत्रणा विकसित केली आहे ?
पेड न्यूजसंदर्भात माध्यमांवर देखरेख करण्यासाठी आयोगाने जिल्हा आणि राज्य स्तरावर माध्यम प्रमाणीकरण आणि निरीक्षण समिती नेमली आहे. बातमीमध्ये राजकीय जाहिरात आहे का हे पाहण्यासाठी ही समिती सर्व वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची छाननी करते आणि संबंधित उमेदवारांविरोधात आवश्यक कारवाई करते.

* जिल्हास्तरीय माध्यम निरीक्षण समिती म्हणजे काय आणि तिचे कार्य काय आहे ?
जिल्हास्तरीय माध्यम निरीक्षण समिती निरीक्षण व्यवस्थेमार्फत पेड न्यूजच्या तक्रारींची तपासणी करते. पेड न्यूजच्या संशयित प्रकरणांमध्ये प्रकाशित मजकूरावरील प्रत्यक्ष खर्च निवडणूक खर्च खात्यात समाविष्ट केला असल्यास ही समिती निवडणूक अधिकार्‍याला उमेदवारांना नोटीस बजावण्याबाबत सूचित करते. जिल्हा समिती विचार करून उमेदवाराला/पक्षाला आपला अंतिम निर्णय कळवते.

* राज्यस्तरीय माध्यम निरीक्षण समिती म्हणजे काय आणि तिचे कार्य काय आहे ?
जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या पेड न्यूजच्या सर्व प्रकरणांची तपासणी राज्यस्तरीय माध्यम समिती करते आणि काही प्रकरणांची स्वत:हून दखल घेत संबंधित निवडणूक अधिकार्‍याला उमेदवाराला नोटीस बजावायचे आदेश देते. आव्हानात्मक प्रकरणे प्राप्त झाल्यापासून ९६ तासांच्या आत राज्यस्तरीय माध्यम समिती प्रकरणाचा निपटारा करते आणि जिल्हास्तरीय समितीकडे एक प्रत पाठवून उमेदवाराला निर्णय कळवला जातो.

* राज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात कुठे आव्हान दिले जाते?
जिल्हास्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात राज्यस्तरीय समितीकडे तर राज्यस्तरीय समितीच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाकडे उमेदवार अपिल करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम आहे.

* जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात किती दिवसात अपील करता येते?
उमेदवाराला जिल्हास्तरीय माध्यम समितीचा निर्णय मान्य नसेल तर तो ४८ तासांत राज्यस्तरीय समितीकडे दाद मागू शकतो. तसेच राज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधातही ४८ तासांत उमेदवार निवडणूक आयोगाकडे अपिल करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम आहे.

*पेड न्यूज प्रकरणी माध्यमांवर कोणती कारवाई केली जाते?
पेड न्यूज आहे हे सिध्द झाल्यावर आयोग प्रिंट मिडियाचे प्रकरण प्रेस कौन्सिलकडे तर इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रकरण राष्ट्रीय प्रसारण मानक प्राधिकरणाकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवतो.

* पेड न्यूजचे निकष काय आहेत?
ठराविक निकष नाहीत, काही उदाहरणे आहेत
१) स्पर्धात्मक प्रकाशनांमध्ये, छायाचित्रे आणि शीर्षकासह समान लेख आढळणे.
२) विशिष्ट वृत्तपत्रांच्या एकाच पानावर, उमेदवारांची प्रशंसा करणारे आणि त्यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता वर्तवणारे लेख.
३) एखाद्या उमेदवाराला समाजातील प्रत्येक घटकाचा पाठिंबा असून त्या मतदारसंघातून तो निवडणूक जिंकणार असल्याबाबतचे वृत्त.
४) एखादा कार्यक्रम ज्यात उमेदवाराची अधिक प्रसिध्दी करणे आणि विरोधकांच्या बातम्या न घेणे.
५) प्रेस कौन्सिलचे पेड न्यूजवरील निर्णय मार्गदर्शनाचा स्रोत म्हणून वापरणे.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघापैकी ऐरोली मतदारसंघ हा ठाण्याच्या सीमेलगतच असून सध्या या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक कमी असले तरी गत लोकसभा-विधानसभा निवडणूकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने हा मतदारसंघ शिवसेनेच्या प्रभावाखाली गेल्या काही महिन्यात वाटचाल करत असल्याने लोकसभा निवडणूकीत ऐरोली विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला मताधिक्य देवून विधानसभा निवडणूकीची तालिमच शिवसेनेच्या इच्छूकांकडून सुरू झाल्यान या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही जोर लावला तरी शिवसेनेची आघाडी रोखणे राष्ट्रवादीच्या रथी-महारथी धुरींणींना अवघड ठरणार आहे.
गतलोकसभा निवडणूकीत ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणण्यासाठी शिवसेनेकडून फार पूर्वीपासून रणनीती आखली जात आहे. मतदारसंघ खेचायचाच या इर्षेने पेटलेल्या शिवसेनेने राजन विचारेंसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आमदारालाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राजन विचारेंची ठाणे महापौरपदाची कारकीर्द ठाणेकरांना सुखावणारी असल्याने ठाण्यातून शिवसेनेला धोबीपछाड करणे तसेच ठाण्यातून जास्तीत जास्त मतदान खेचणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य होणार नाही. गतलोकसभा निवडणूकीच्या तुलनेत मनसेचा प्रभाव नसल्याने राजन राजेंसारखी १ लाख ३४ हजार मते या निवडणूकीत पुन्हा प्राप्त करणे मनसेच्या उमेदवाराला जमणार नाही. ठाण्यातील मताची शिदोरी बांधून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याची योजना शिवसेनेच्या ‘थिंक टँक’कडून आखली जात आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा ठाण्याच्या लगतच असून ठाण्यातील शिवसैनिकांची फौज ऐरोली-दिघा व लगतच्या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घडामोडीवर लक्ष्य ठेवून आहे. त्यातच ऐरोली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असंतुष्ठांनी संख्या गतकाही महिन्यापासून वाढीस लागली आहे. पालिकेतील नाराज असंतुष्ठ आत्म्याची गुप्त बैठक गोठीवली गावात एका मातब्बराच्या बंगल्यावर झाली होती, हा इतिहासही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. गतविधानसभा निवडणूकीत ऐरोली मतदारसंघात कोपरखैरणे आणि तुर्भेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मनापासून सहकार्य केल्याने अकरा हजार ९५७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. या जागेवर गतविधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळाला असला तरी राष्ट्रवादीच्या धुरींणांची दमछाक झाल्याचे ठाणे जिल्ह्याने जवळून पाहिले होते. नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्‍या ना. गणेश नाईकांना बेलापूर सोडून निवडणूक कालावधीत सर्वाधिक काळ ऐरोली मतदारसंघातच ठाण मांडून त्याकाळात बसावे लागले होते. घणसोली कॉलनीपर्यत राष्ट्रवादी कॉंग्रेस पिछाडीवर होती. संदीप नाईकांना त्या निवडणूकीत ७९ हजार ७५ मते तर शिवसेनेच्या उमेदवार असणार्‍या जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंना ६७ हजार ११८ मते पडली होती.
ऐरोली मतदारसंघ दिघ्यापासून तुर्भ्यापर्यत विखुरलेला आहे. तुर्भे हा गत विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयातील ‘मॅन ऑफ द मॅच’या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तुर्भेतून मतदान राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी खेचताना सुरेश कुलकर्णीनींनी जीवाचे रान केले होते. सुरेश कुलकर्णी आजही तुर्भे परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकखांबी तंबू असून येथील जनाधार सुरेश कुलकर्णींच्या मागे आहे. स्थायी समितीच्या कारभारात सुरेश कुलकर्णीच्या चेहर्‍यावर गतकाही महिन्यात उमटलेली नाराजी केवळ स्थायी समिती सदस्य आणि पालिका अधिकारी यांच्यापुरतीच मर्यादीत न राहता पालिका मुख्यालयात वावरणार्‍या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जगजाहीर झाली होती.
कोपरखैरणे हा नोड राष्ट्रवादीकरांचे पर्यायाने बोनकोडेकरांचे ‘होमपीच’ मानले जात आहे. तथापि या होमपीचच्या खेळपट्टीला तडे गेल्याने राष्ट्रवादीच्या छावणीतील चेंडू स्वींग होवू लागले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीच्या फलदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी तडे गेल्यामुळे शिवसेनेच्या गोलदाजांना ही खेळपट्टी या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर मदत करणारी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे एक निष्णात क्रिकेटपटू असल्याने त्यांना यामागील मतीथार्थ लागलीच समजून येईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तनाने असणारा व मनाने कुठेही स्वच्ंछदी फिरणारा एक ज्येष्ठ नगरसेवक सतत ‘शिव’राळ भाषा वापरत असल्याने तो राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी काम करण्याची सुत‘राम’ही शक्यता नाही. त्यातच दीड वर्षापूर्वी एका सातारी घटकाने परप्रातिंय पदाधिकार्‍याच्या सहकार्याने एका माजी नगरसेवकाची प्रतिमा मलिन करण्याचा केलेला प्रयास, लोकांसमोरच वापरलेली भाषा आणि बातम्या मॅनेज करून पातळी ओंलाडून केलेले राजकारण, सरकारराज या वर्तमानपत्राचे घराघरात केलेले वितरण कोपरखैरणे भागातील पुणेरी समाज आजही विसरलेला नाही. हा माणूस बोनकोडेचा निष्ठावंत असतानाही त्याला वार्‍यावर सोडल्याचे शल्य केवळ कोपरखैराणेतच नाही तर भाजी, फळ आणि कांदा मार्केटमधील घटकांकडून उघडपणे बोलले जात असून आपल्या माणसाशी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजीचा संतप्त सूरही आजही आळविला जात आहे.
वैभव नाईकांनी शिवसेनेचा खांद्यावर घेतलेला भगवा ऐरोली मतदारसंघात शिवसेनेला निर्णायक आघाडीसाठी चांगलाच हातभार लावण्याची चिन्हे आतापासून निर्माण झाली आहे. ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणूकीसाठी ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेच्या छावणीतून चर्चिल्या जाणार्‍या नावांपैकी वैभव नाईक हे एक प्रबळ दावेदार मानले जातात. लोकसभेनंतर चार महिन्यासाठी होणार्‍या विधानसभेची लोकसभा निवडणूक रंगीत तालिमच असल्याने व आपल्या मागे असलेला जनाधार मतपेटीत दाखविण्यासाठी वैभव नाईकांनाही परिश्रमाची शिकस्त करावी लागणार आहे. वैभव नाईकांच्या पाठीशी असणारा युवा वर्ग, सर्वसामान्यांमध्ये वैभव नाईकांप्रती असणारे आकर्षण, कै. तुकाराम नाईकांचा या भागात आजही मोठ्या संख्येने असणारा चाहता वर्ग आदी सर्व बाबी ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे.
ऐरोली मतदारसंघातील कॉंग्रेसी घटकांची राष्ट्रवादी कॉंग्रेसवर असलेली नाराजीदेखील जगजाहीर आहे. आघाडी असली तरी लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आम्ही यांचे काम करायचे आणि वाढत्या ताकदीचा फायदा घेत स्वबळाच्या नावाखाली यांनी आम्हाला चिरडायचे असा नाराजीचा पण काहीसा संतप्त सूर येथील कॉंग्रेसी पदाधिकार्‍यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे.
घणसोली कॉलनी व घणसोली गाव परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असले तरी गत लोकसभा व विधानसभा निवडणूकीत येथे मताधिक्य मिळविणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य झाले नव्हते. पालिका निवडणूकीत या ठिकाणी राष्ट्रवादीचे शिलेदार विजयी होतात, पण हेच शिलेदार लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पक्षाला खुद्द स्थानिक पातळीवरील सुप्रिमोलाही मताधिक्य मिळवून देवू शकत नाही. लोकसभा पोटनिवडणूकीत संजीव नाईक हे आनंद पराजंपेच्या विरोधात पराभूत झाल्यावर घणसोली गावातीलच बोनकोडेचा नातेवाईक गोव्याला श्रमपरिहारासाठी दुसर्‍याच दिवशी निघून गेला असल्याची खमंग चर्चा आजही अधूनमधून होतच असते. त्यातच घणसोली गावात आगामी पालिका निवडणूकीविषयी पाटीलकीतच सुंदोपसुंदी अर्ंतगत धुसफुसत असल्याने राष्ट्रवादीला याचाही फटका बसणार आहे. दिघा परिसरात शिवसेनेचा प्रभाव असल्याने तेथे शिवसेनेपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसची फारशी डाळ शिजणार नाही.
ऐरोलीमध्ये तात्या तेली, अनंत सुतार, एम.के.मढवी, जी.एस.पाटील, अशोक भाऊ पाटील अशी नानाविध नावांची मांदीयाळी असली तरी या ठिकाणीदेखील लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा प्रभाव रोखणे या घटकांना अवघड जाणार आहे. मनोज हळदणकर प्रकरणाने आजही येथील शिवसैनिक संतप्त असून ते आपला राग मतपेटीतून व्यक्त करण्याची शक्यता आहे.
ऐरोलीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचा करिश्मा आहे. या भागात पालिका सभागृहातील नगरसेवक व सेनेचे पक्षीय पदाधिकारी प्रबळ असल्याने या भागात शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीला चमत्काराचाच आधार घ्यावा लागणार आहे. विधानसभेच्या संभाव्य नावांमध्ये खुद्द जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचेही नाव असल्याने चौगुलेंना आपली लोकप्रियता व पाठीमागे असलेला जनाधार मतपेटीतून दाखवून देण्याची आणि लोकसभा-विधानसभा निवडणूकीतील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आयती चालून आलेली आहे.
ऐरोली भाग ठाण्याला लागूनच असल्याने आ. राजन विचारेंच्या प्रचारासाठी ठाण्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी ऐरोली विधानसभेतही प्रचारादरम्यान आपला करिश्मा दाखविण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजीव नाईक हे ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक यांचे वडीलबंधू आहेत. ऐरोलीतून संजीव नाईकांना मतदानात धोबीपछाड मिळाल्यास काही महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणूकीसाठी संदीप नाईकांना धोक्याची घंटा ठरू शकते.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अस्तित्वाचा तर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. शिवसेनेने आमदार राजन विचारेंसारखा स्वच्छ प्रतिमेचा तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आम आदमी पार्टी’ पक्षाप्रती परप्रातिंयाची लोकप्रियता पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणावर ‘हात’च्या मतांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत आघाडीचा धर्म निभवायचा आणि पालिका निवडणूकीत टक्कर द्यायची या रणनीतीवर ‘जालिम’ उपाय शोधण्यासाठी गतपंचवार्षिकमध्ये पालिका स्तरावर राजकारण खेळताना कॉंग्र्रेसी शिलेदारांना सहन कराव्या लागलेल्या मनस्तापाचा हिशोब चुकता करण्याची स्थानिक पातळीवर मातब्बर कॉंग्रेसींनी तयारी सुरू केल्याचे पडद्याआडच्या घडामोडीवरून पहावयास मिळत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करून त्यांचे निवडणूक चिन्ह नवी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय करायचे आणि महापालिका निवडणूकीत स्वबळावर निवडणूक लढविताना आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह सांगायचे अशा दुहेरी कात्रीमुळे कॉंग्रेस पक्षाची नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हानी झाली असल्याचे कॉंग्रेसी पदाधिकार्‍यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. नवी मुंबईत पक्षसंघटना वाढविताना राष्ट्रवादीच्या घटकांनी कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यात कोणताही मुलाहिजा बाळगला नसल्याने आपण त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मदत करून नवी मुंबईत कॉंग्रेस संपविण्याचे निमत्रंण का द्यायचे असा संतप्त सूरही कॉंग्रेसी घटकांकडून आळविला जावू लागला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाबरोबरच नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहाल करण्याचा कॉंग्रेस श्रेष्ठींचा निर्णय स्थानिक भागातील कॉंग्रेसींनी आजही मान्य केलेला नाही. त्यामुळेच २००४च्या विधानसभा निवडणूकीत ज्येष्ठ कॉंग्रेसी नेते हरिबंशसिंह यांनी तर २००९च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव भगत यांनी बंडखोरी करत सर्वसामान्य कॉंग्रेसी कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून दिलेली आहे.
नामदेव भगत हे महापालिकेत नगरसेवक, सिडकोत संचालक आणि कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस असून प्रदेश कॉंग्रेसमध्ये आणि मंत्रालयीन पातळीवरदेखील त्यांनी गतकाही वर्षात आपला दबदबा निर्माण केला आहे. नामदेव भगत यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यावरही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रिडा उपक्रम राबविताना बेलापूर मतदारसंघात आपला नावलौकीक वाढविण्याचे काम केले आहे. धार्मिक यात्रा, क्रिडा स्पर्धांचे आयोजन, आगरी-कोळी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह अशा नानाविध कार्यक्रम राबविताना बेलापूर विधानसभा मतदारसंघात आपली प्रबळ दावेदारी आजही कायम ठेवली आहे. दशकभरापेक्षा अधिक कालावधीत नामदेव भगत यांना ज्यांनी त्रास दिला, नामदेव भगत यांचे समूळ राजकीय खच्चीकरण करण्याचाच ज्यांनी प्रयास केला, त्यांनाच मदत का म्हणून, कशासाठी करायची असा प्रश्‍न नेरूळ, जुईनगर, सानपाडा, शिरवणे, बेलापूर, सिवूड्समधील कॉंग्रेसचे पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते आता उघडपणे विचारू लागले आहेत.
दशकभरापूर्वी नेरूळ गावातील गावदेवी यात्राप्रकरणात झालेल्या मारहाणीच्या घटनेत पडद्याआडून नामदेव भगत विरोधकांना मदत करून नामदेव भगत यांना पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणत्या राजकारण्यांने त्यांना नेरूळ गावातूनच पळताभुई थोडी केली होती, तो इतिहास आजही नामदेव भगत समर्थक व कॉंग्रेसी कार्यकर्ते विसरलेले नाहीत. महापालिकेच्या चौथ्या निवडणूकीत नेरूळ सेक्टर १० प्रभागात नामदेव भगत यांच्या प्रभागासाठी शेवटचे तीन-चार दिवस तळ ठोकून कोणीकोणी पडद्यामागून ‘उचापती’ केल्यात त्याचे पुरावे आजही नामदेव भगत समर्थंकांकडून मांडले जात आहे. नेरूळ गावातील ‘बांचोली मैदान’ हा कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. इंदूमती भगत यांच्या प्रभागातील विषय असताना कोणी त्यामागे हस्तक्षेप केला, कोणी राजकारण करून इंदूमती भगत यांच्या प्रस्तावाचे राजकारण केले हे जगजाहीर असतानाही आमच्याकडून कोणी लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा का म्हणून बाळगता, असा संतप्त सूरही कॉंग्रेसी छावणीतून आळविला जात आहे.
कॉंग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व मुलुखमैदानी तोफ असणार्‍या दशरथ भगत यांच्या पालिका प्रभागात सानपाडा-पामबीच परिसरातील मोराजसमोरील भुखंडावर उद्यान व क्रिडांगण विषयाचे स्थायी समितीत झालेले राजकारण, त्यावर उद्रेक होवून संतप्त दशरथ भगतांना तत्कालीन सभापती अनंत सुतार यांच्यासमक्ष खुर्ची उचलून आपला व्यक्त केलेला राग या घटना आजही दशरथ भगतांचे समर्थक व त्यांच्या प्रभागातील कॉंग्र्रेसी कार्यकर्ते आणि जिल्हा कार्यकारिणीतील त्यांचे पदाधिकारी विसरलेले नाहीत. दशरथ भगत यांचा त्यांच्या पालिका प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना पराभूत करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य झालेले नाही आणि दशरथ भगतांचे कार्य व असणारा जनसंपर्क पाहता नजीकच्या कालावधीतही ते शक्य होणार नाही. तिसर्‍या सभागृहातील पालिका निवडणूकीत सानपाड्यातील सिडको कम्युनिटी सेंटरवर झालेला गोंधळ आणि चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत सानपाडा-पामबीच भागातील साधु वासवानी शाळेसमोर झालेला गोंधळ आजही खुद्द दशरथ भगत आणि त्यांचे समर्थक विसरलेले नाहीत.
सारसोळे गावातील मनोज मेहेर हे सारसोळे आणि नेरूळ सेक्टर सहामधील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका, मंत्रालय व जनता दरबार हेलपाटे मारत असताना त्यांना एकदाही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभागातील नागरी समस्या निवारणासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. हजारो लेखी तक्रारी करून नागरी समस्यांचे निवारण झालेले नाही. असंख्य लेखी पत्रे देवूनही महापौर-उपमहापौेर प्रभागाच्या भेटीला मेहेरांच्या बोलवण्यावरून एकदाही आले नाहीत. सारसोळेच्या जेटीवरील हायमस्ट झालेले राजकारण पालिका अधिकार्‍यांकडूनच ‘ओपन’ झाल्याने आम्हाला अंधारात मासेमारी करण्यास भाग पाडणार्‍यांना मदत करणे आमच्या गावातील कोळी समाज करणे शक्यच नसल्याचे मनोज मेहेरच्या निकटवर्तीय ग्रामस्थांकडून उघडपणे बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनाही प्रभागात कामे करताना सातत्याने शीतयुध्दाचा तर कधी होर्डिगबाजीतील लढाईचा सामना करावाच लागत आहे. कॉंग्रेसचे मातब्बर नेते व माजी उपमहापौर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते रमाकांत म्हात्रेंचे पालिका स्तरावरील राजकारण संपविण्यातसाठी गोठीवलीतही पालिका निवडणूक काळात बर्‍याच नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मतांसाठी कॉंग्रेसची मनधरणी केली जाते आणि दुसरीकडे पालिका निवडणूकीत कॉंग्रेसला चिरडायचे या राष्ट्रवादीच्या रणनीतीमुळे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला मदत न करता अलिप्त रहायचे असा एकाचा गटाचा सुर आहे तर दुसर्‍या गटाकडून मात्र लोकसभा निवडणूक संधी आल्याचे रागून पालिका स्तरावर आपल्याशी खेळल्या जात असलेल्या राजकारणाचा हिशोब चुकता करण्याची आक्रमक संतप्तता दुसर्‍या गटाकडून दाखविली जात आहे.